Pimpri: प्लाझ्मा थेरपीची संख्या वाढवा; खासदार बारणे यांची आयुक्तांना सूचना

Increase the number of plasma therapies; MP Barne's instruction to the Commissioner : प्लाझ्मा डोनर बँक तयार करावी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी यशस्वी होत आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे 13 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे पालिकेने कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा घ्यावा.  या माध्यमातून प्लाझ्मा डोनर बँक तयार करुन  प्लाझ्मा थेरपीची संख्या वाढविण्यात यावी, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पालिका आयुक्तांना केली आहे.

खासदार बारणे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठविले आहे. त्यात  म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

तर, दुसरीकडे बरे होणा-या रुग्णांची संख्याही जास्त आहे. आजपर्यंत पाच हजार 362 रुग्णांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे.  बरे झालेल्या रुग्णांची माहिती पालिकेकडे उपलब्ध आहे.

बरे झालेल्या रुग्णांचे मत परिवर्तन करावे. त्यांचा प्लाझ्मा घेण्यात यावा. प्लाझ्मा थेरपीची संख्या वाढविण्यात यावी. या माध्यमातून प्लाझ्मा डोनर बँक तयार करावी. जेणेकरुन वाढत्या रुग्णसंख्येतील लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करता येईल.

त्यातून रुग्ण बरे होण्यास मोठी मदत होईल.  आजपर्यंत वायसीएममध्ये प्लाझ्मा थेरपी केल्याने 13 रुग्ण बरे झाले आहेत.

पालिका रुग्णालयात उपचार घेऊन पाच हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचे मतपरिवर्तन करावे. प्लाझ्मा थेरपीबाबत जनजागृती केली. त्यांच्याशी संपर्क साधावा.  बरे झालेल्या रुग्णांमधून अनेकजण प्लाझ्मा देण्यास तयार होतील.

पॉझिटीव्ह रुग्ण बरे होण्यासाठी मोठी मदत होईल. मृत्यूचे प्रमाणही कमी होईल. त्यामुळे प्लाझ्मा बँकेचे काम अधिक जलदगतीने करण्यात यावे, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली आहे.

तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.