Pimpri : विविध संस्था, संघटना यांच्यावतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात भारताचा 72 वा स्वातंत्र्यदिन विविध संस्था व संघटना यांच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण, खाऊवाटप आदी उपक्रम घेण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहर भाजपातर्फे पिंपरी-चिंचवड शहर कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. आमदार लक्ष्मण जगताप यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ‘नमन वीर जवानांना वंदन बळीराजाला’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, गटनेते एकनाथ पवार, लोकलेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्रमोद निसळ, उमा खापरे, आर.एस कुमार, शैला मोळक, अमित गोरखे, अमोल थोरात, विजय लांडे, रामकृष्ण राणे,संजय परळीकर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या वतीने जयनारायण मंगल स्मृतिवन मोशी येथे ७२ वा स्वतंत्रदिन स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकर मोरे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी अशोक मोरे आणि राजन पिल्ले यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक जयनारायणजी मंगल ह्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना स्मरून त्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सर्वाना लाडू वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

यावेळी काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मंगल, पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष दिलीपसिंग मोहिते, महासचिव राजन पिल्ले, महासचिव अमर नाणेकर, सचिव आयुष मंगल, सचिव अशोक काळभोर, संदेश नवले, आबा खराडे, रविराज साबळे, प्रताप दहितुले, काँग्रेस पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष गुरुदेव वैराळ, सचिव राजेश नायर, श्वेता मंगल, कमला ध्यानी, नेहा मंगल, राधा नायर, प्रवीण काकडे, जोशुआ नायर, आयुविर मंगल, रेणुका काकडे, अक्षांश मंगल, वैष्णवी काकडे तसेच मोशी येथील अनेक कामगार उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका वैशाली घोडेकर, गीता मंचरकर, अनुराधा गोफणे, अपर्णा डोके, महंम्मद पानसरे, विश्रांती पाडाळे, आनंदा यादव, ज्ञानेश्वर कांबळे, शकुंतला साठे, सुनिल गव्हाणे, विनोद कांबळे, सिंधु पांढारकर, प्रदीप गायकवाड, कविता खराडे, मनीषा गटकळ, संजय औसरमल, तुकाराम बजबळकर, निलेश डोके, महेश झपके, दतात्रय जगताप, शीला भोंडवे, शशिकांत निकाळजे, बाळासाहेब पिल्लेवार, शुक्रुल्ला पठाण, किरण देशमुख, सुलेमान शेख, मिना मीना मोहिते, सविता खराडे, जयश्री प्रसाद, हमीद शेख, उत्तम हिरवे, सैफ शेख, विक्रम पवार, सचिन काळे, मीना कोरडे, मीनाक्षी उंबरकर, गोरोबा गुजर, सर्जेराव जगताप, देवी थोरात, सुवर्णा सूर्यवंशी, देविदास गोफणे, कविता ताटे, रूपाली गायकवाड, सुनंदा काटे, दीपाली देशमुख, सचिन औटे, जहिर खान, बाळासाहेब सोनवणे, निलेश पुजारी, शशिकांत चौंडीकर, धनाजी तांबे, सुनील अडागळे, सूर्यकांत पात्रे, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय कांबळे, सुप्रिया सोळांकुरे, मीना कोरडे, शिल्पा बिडकर, दत्तात्रय चोरमले, शमा कोरवू आदी ‍पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने 72 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी येथील संत तुकारामनगर येथे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांच्या शुभ स्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सुलोचना शिलवंत उपस्थित होत्या.

यावेळी भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीरपुत्रांना तसेच शहीद कौस्तुभ राणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी केंद्र संचालक सुरेश पवार यांनी कामगारांसाठी शासनाच्या विविध योजनांची व कामगारांच्या मुलांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची माहिती दिली. भाग्येश भालेराव या लहान मुलाने पटनाटय सादर केले. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात अपंगत्व आलेले माजी सैनिक नारायण शिंदे व अण्णा जोगदंड हस्ते लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष विकास शहाणे, सामाजिक कार्यकर्त्या संगीता जोगदंड, गुणवंत कामगार गोरखनाथ वाघमारे, यादव तळोले, भगवान पाटील, एस. डी. विभूते, मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर, हेमंत नेमाडे, ईश्वर सोनोने, सचिन नेमाडे, अरविंद मांगले, वसंत चकटे, आमोल गोवरदिपे, राहुल शेडगे, चंद्रकांत भालेराव, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सचिव सुनील रोकडे, सहसचिव पंडित वनस्कर आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्र उपसंचालिका सुरेखा मोरे, माधवी खुने,संगीता खोमणे, शैलैजा आवडे यांनी परिश्रम घेतले.

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान व मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर येथे ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी राजेंद्र घावटे, विलास जेऊरकर, वाहतूक पोलीस प्रमोद सुरवसे, कुबेर गुदले, माधव धावडेकर, शांताराम पवार, संजय ढमढेरे, विजय आढाव आदी उपस्थित होते. अरविंद वाडकर यांनी सूत्रसंचालन केले. संयोजन महेश पवार, राजेंद्र हरेल, प्रवीण शेवते, राहुल वाडकर यांनी केले.

समस्त शिवतेजनगर वासियांच्या वतीने तिरंगा चौक येथे ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. तत्पूर्वी परिसरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रभात फेरी काढली. याप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक संजय नेवाळे, नगरसेविका योगिता नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते शैलेश मोरे, शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीपान मंगवडे, उपाध्यक्ष अनिल नेवाळे, राम भोसले, बालाजी कानवटे, नामदेव निकम, बाळासाहेब गंगावणे, चंद्रकांत बावळे, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले. आभार प्रदर्शन राजेंद्र कुलकर्णी यांनी केले.

रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या कार्याध्यक्षा अंजना गायकवाड व संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी महासचिव संतोष शिंदे, सहसचिव भाग्यश्री आखाडे, महाराष्ट्र राज्याचे खजिनदार संदेश पिसाळ, सचिव नीरज भालेराव, सहसचिव मेघा आठवले, उपाध्यक्ष शशिकांत कुंभार, पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष रोहित कांबळे, उपाध्यक्ष महेश गायकवाड सचिव आनंद विजापूरे, सहसचिव समाधान गायकवाड, संघटक ऋषिकेश हेंद्रे, सदस्य रेश्मा इनकर, प्रीतम वाघमारे, महेश सोनवणे, निखिल मुरकुटे उपस्थित होते.

रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या कार्याध्यक्षा अंजना गायकवाड व संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी महासचिव संतोष शिंदे, सहसचिव भाग्यश्री आखाडे, महाराष्ट्र राज्याचे खजिनदार संदेश पिसाळ, सचिव नीरज भालेराव, सहसचिव मेघा आठवले, उपाध्यक्ष शशिकांत कुंभार, पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष रोहित कांबळे, उपाध्यक्ष महेश गायकवाड सचिव आनंद विजापूरे, सहसचिव समाधान गायकवाड, संघटक ऋषिकेश हेंद्रे, सदस्य रेश्मा इनकर, प्रीतम वाघमारे, महेश सोनवणे, निखिल मुरकुटे उपस्थित होते.

औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात 72 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष राम जनार्दन कांडगे उपस्थित होते. तरुणांनी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन राम कांडगे यांनी यावेळी बोलताना केले. तसेच पाहुण्यांच्या हस्ते अर्थशास्त्र विभागाने, आय टी विभागाने आणि इंग्रजी विभागाने तयार केलेल्या स्मरणिकेचे आणि भित्तीपत्रिकेचे उदघाटन करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त किड पँराडाइज स्कूलमध्ये कवी पितांबर लोहार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती फेरी काढून मुलांनी बनविलेल्या कागदी पिशव्यांचे परिसरातील दुकानदारांना वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक अँड सचिन काळे, संस्थापक आनंत काळे, संचालिका स्वाती काळे ,प्रज्ञा काळे, मुख्याध्यापक विद्युत सहारे व शिक्षक, उपस्थित होते.

पिंपळे सौदागर परिसरात विविध ठिकाणी 72 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अण्णासाहेब मगर माध्यमिक व प्राथमिक शाळा, पी. के. इंटरनेशनल स्कूल,रॅबिट अँड टॉरटाईज स्कूल तसेच परिसरातील ब्ल्यू वूड्स, गणेशम फेज 22, ओरीएट्स, साई व्हिजन साई अम्बिअन्स, पीस वॅली,लक्षदीप,मयुरेश्वर साई निसर्ग पार्क, सुखवानी सेलिनो या सोसायट्यामध्ये नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .

यावेळी शिवसाई रस्ता येथील शिवम सोसायटी, साई मॅजेस्टिक सोसायटी तसेच द्वारका फ्लोरा रेसिडेन्सी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मनपा कर्मचारी महासंघ अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, यशदा रियल्टी चेअरमन संजय भिसे, पी. के. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, सोसायटी मधील कमिटी मेंबर्स,ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी प्रभागातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थांना खाऊ वाटप करण्यात आले.

ब्रिलियंट स्टार प्री स्कूलमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पिंपळे गुरव येथील एम जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूलमध्ये नगरसेवक तथा ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी बालचमुनी परेड करून ध्वजाला मानवंदना दिली, शिस्तबद्ध कवायत, देशभक्तीपर भाषणे आणि देश रंगिला रंगिला..,सुनो गौरसे दुनियवालो-बुरी नजर ना हम पे डालो.. अशी देशभक्तीपर गीते सादर करून विद्यार्थांनी उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी प्रमुख अतिथी केंद्रीय विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक वसंत जाधव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगितले. सामाजिक उपक्रम म्हणून स्कूलतर्फे सीमेवरील जवानांना राख्या पाठविण्यात आल्या. शेवटी विद्यार्थाना खाऊवाटप करून वंदेमातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाला माजी नगरसेवक शंकर जगताप, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, संस्थापक रामदास देवकर, शांताबाई देवकर, स्वीकृत नगरसेवक महेशदादा जगताप, नगरसेवक सागर अंघोळकर, नगरसेविका उषाताई मुंढे, चंदा लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देवकर, नंदकुमार देवकर, राजाभाऊ लोखंडे, पांडुरंग मिंढे, नवनाथ देवकर, देवदास देवकर, सरस्वती देवकर व मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन माधुरी बांद्रे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका वंदना देवकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.