Pimpri: औद्योगिकनगरीत दोन महिन्यात कोरोनाचा दोनशेचा आकडा पार

Pimpri: Industrial township crossed the mark of 200 corona patients in two months

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड औद्योगिनगरीतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन महिन्यात दोनशेचा आकडा पार केला आहे. 10 मार्च ते 17 मे या 70 दिवसात शहरातील 204 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 125 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. शहरातील चार जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरातील कोरोना संशयितांच्या चाचण्या होण्याचे प्रमाणही कमी असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात सापडला होता. 10 मार्च रोजी एकाच दिवशी शहरातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर लागोपाठ 12 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे राज्याचे लक्ष शहराकडे लागले होते. त्यानंतर काही दिवस एकही रुग्ण सापडला नव्हता. त्यानंतर एप्रिलमध्ये रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले. बघता बघता कोरोनाने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला विळखा घातला. दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत.  10 मार्च ते 17 मे या 70 दिवसात शहरातील 204 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

अनेक पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे!

पिंपरी-चिंचवड शहरातील पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी त्यापैकी अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. केवळ पॉझिटीव्ह आहेत. पण लक्षणे काहीच नाहीत अशा रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर, अनेक पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण तुरळक आहे. त्यामध्ये रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे.

आजपर्यंत पॉझिटीव्ह आलेल्या 204 रुग्णांपैकी 125 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी असून शहरातील चार जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण!

महापालिकेच्या आठही प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये प्रभागातील काही भागात रुग्ण नाहीत. पिंपरीगाव, खराळवाडी, दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी, आकुर्डी, चिंचवडस्टेशन, मोहननगर, चिंचवडमधील पिंपळेगुरव, सौदागर, निलख, जुनी- नवी सांगवी, वाकड, पुनावळे, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, किवळे-विकासनगर आणि भोसरीतील भोसरी, दिघी, मोशी, च-होली, रुपीनगर, चिखली, संभाजीनगर शहराच्या जवळपास अशा सर्वच भागांत आजपर्यंत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

केवळ रावेत, चिंचवडगाव, निगडी, प्राधिकरण, यमुनानगर, निगडी गावठाण अशा काही भागात रुग्ण सापडले नाहीत. ही दिलासादायक बाब मानली जात आहेत.

चाचण्यांचे प्रमाण कमी!

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) कडे पाठविले जातात.  ‘एनआयव्ही’वर कामाचा ताण येत आहे. तसेच भोसरीतील ‘नारी’संस्थेत देखील नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. परंतु, त्यांचे पुर्ण क्षमतेने काम सुरु झाले नाही.  त्यामुळे शहरातील कोरोना संशयितांच्या चाचण्या कमी होत आहेत. चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ झालेली दिसून येत नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात – महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर

 ”पिंपरी-चिंचवड शहरातील 204 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यातील 125 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजमितीला सक्रिय 75 रुग्ण आहेत. रुग्ण वाढीचा दर 18 टक्के आहे. रुग्ण वाढीचा दर हाच कायम राहिला. तर, तीनपट रुग्ण होतील. पण, महापालिकेकडून  ट्रॅकिंग फास्ट केले जात आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.