Pimpri: औद्योगिकनगरीतील उद्योग पूर्ण क्षमतेने सुरु; टाटा मोर्टसमध्येही खबरदारी घेत उत्पादनाला सुरुवात

Industries in the industrial city started at full capacity; Tata Motors also started production with caution

एमपीसी न्यूज – लॉकडाउनमध्ये शिथिलता आणत पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतील उद्योग सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर आता ख-या अर्थाने पूर्ण क्षमतेने कारखाने, कंपन्या सुरु झाल्या आहेत. टाटा मोटर्स कंपनीने  देखील पुरेशी खबरदारी घेत उत्पादनाला सुरुवात केली आहे. यामुळे शहरातील अर्थचक्र सुरु झाले असून कामगार वर्गालाही मोठा दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत टाटा मोटर्स, बजाज, महिंद्रा या मोठ्या कंपन्यांसह एमआयडीसीतील लघुउद्योग काम करतात. सुमारे 11 हजार सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि कारखाने आहेत.

लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून हे उद्योग बंद होते. उद्योजकांच्या मागणीनुसार राज्य सरकारने 14 मे पासून अटी-शर्तीसह उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली होती. पण, शहरातील टाटा मोटर्स कंपनी सुरु झाली नव्हती.
राज्य सरकारने शहराला रेडझोनमधून वगळले आहे. त्यामुळे महापालिकेने 22 मे  पासून उद्योग पुर्ण क्षमेतेने सुरु करण्यास परवानगी दिली.  आता टाटा मोटर्स कंपनीही पूर्ण क्षमेतेने सुरु झाली आहे.

काम करताना सुरक्षित अंतर पाळले जात आहे. कामगारांना आतमध्ये सोडताना तापमान तपासले जाते. सुरक्षिततेची पुरेशी खबरदारी घेतली जात आहे.

कंपनीतील कॅन्टीनमध्येही सुरक्षित अंतर पाळले जात आहे. सुरक्षिततेची पूर्णपणे काळजी घेत उत्पादनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे कामगार वर्गालाही दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्यातील, परराज्यातील काही कामगार आपल्या मूळगावी गेले आहेत.  त्यामुळे मनुष्यबळाची कमरता कंपन्यांना भासत आहे. कुशल, प्रशिक्षित कामगारांची कामगारांची उणीव आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.