Pimpri: ‘कोविड’साठी उपलब्ध  बेडची माहिती मिळणार आता पालिकेच्या ‘डॅशबोर्ड’वर

Information about the bed available for Kovid will now be available on the municipality's 'Dashboard' : 'पीसीसीएफ'च्या मागणीला यश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोविडसाठी उपलब्ध असलेल्या खासगी रुग्णालयातील बेडची माहिती आता पालिकेच्या या संकेतस्थळावरील कोविड 19 ‘डॅशबोर्ड’वर मिळणार आहे.  यामुळे रुग्णांना उपलब्ध बेडची माहिती घर बसल्या मिळणार आहे.

त्यामुळे बेड उपलब्ध असलेल्या रुग्णालयातच रुग्णांना जाणे सोपे होणार आहे. आजपासून माहिती अपडेट करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, उपलब्ध बेडची माहिती डॅशबोर्डवर देण्याची मागणी सर्वांत अगोदर पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम ( ‘पीसीसीएफ’) केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आजपर्यंत शहरातील 10 हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी  ॲक्टिव्ह रुग्णसंख्या साडेतीन हजारांपेक्षा जास्त आहे.

कोरोना होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार करणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याची मुभा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली आहे.

कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध असूनही एखादा रुग्ण आल्यानंतर बेड शिल्लक नसल्याचे अनेक खासगी रुग्णांलयाकडून सांगितले जात होते. रुग्णाला दाखल करुन घेण्यास नकार दिला जात होता.

त्या पार्श्वभूमीवर आता खासगी रुग्णालयातील उपलब्ध बेडची माहिती पालिकेच्या डॅशबोर्डवर प्रसिद्ध केली आहे. आजपासून बेडची संख्या अपडेट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.