Pimpri: कारच्या बोनेटमध्ये अडकलेल्या जखमी घोरपडीला मिळाले जीवनदान

लोकांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या घोरपडीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी कारच्या बोनेटमध्ये जाऊन आश्रय मिळवला असल्याचे लक्षात आले.

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील संत तुकाराम नगरमध्ये 40 ते 50 लोकांचा जमाव दगड, काठ्या घेंऊन घोरपडीला जीवे मारण्याच्या हेतूने तिचा पाठलाग करत होते. दरम्यान, जखमी झालेल्या घोरपडीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी कारच्या बोनेटमध्ये जाऊन आश्रय मिळवला.

संत तुकाराम नगर येथे आलेल्या घोरपडीला मारण्यासाठी 40 ते 50 लोकांचा जमाव दगड, काठ्या घेऊन पाठलाग करत असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संग्राम तावडे, पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचे सरचिटणीस रौनक तावडे व आदित्य देशपांडे यांना मिळाली. या सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली व लोकांना घोरपडीला मारण्यापासून परावृत्त केले व जमावला तिथून पळवून लावले.

लोकांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या घोरपडीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी कारच्या बोनेटमध्ये जाऊन आश्रय मिळवला असल्याचे लक्षात आले. दरम्यान, घोरपडीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी रौनक तावडे व आदित्य देशपांडे यांनी सर्पमित्रला संपर्क साधला.

त्यानंतर सर्पमित्र राजू कदम व वन्य पशू, पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे दीपक शर्मा हे घटना स्थळी पोहोचले. मोठ्या परिश्रमाने घोरपडीला सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आले.

बाहेर काढलेल्या घोरपडीला वन अधिकाऱ्याच्या मदतीने वन विभाग प्रशासकीय इमारत जवळच्या परिसरात सुखरूप सोडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.