Pimpri : यशोदा’ ह्युमन मिल्क बँक आणि संशोधन केंद्राचे नूतनीकरण

रोटरी क्लब ऑफ निगडी आणि डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या तर्फे आयोजन

एमपीसी न्य़ूज – रोटरी क्लब ऑफ निगडी आणि डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, संशोधन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यशोदा’ ह्युमन मिल्क बँक आणि संशोधन केंद्राचे नूतनीकरण तसेच उदघाट्न दि ३१ जानेवारीला पार पडले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या पुढाकाराने ह्युमन मिल्क बँक सुरू करण्यात आली आहे.

मातेचे दूध नवजात अर्भकाला सर्वोत्तम पोषण तसेच आजार आणि संसर्गांपासून संरक्षण देत असते. या धर्तीवर ‘ह्युमन मिल्क बँक’ या संकल्पनेचा वापर केला जातो. या बँकमध्ये मातेचे दूध दात्यांकडून संकलित केले जाते आणि गरजू नवजात अर्भकांसाठी संरक्षित केले .

आईकडून नवजात बाळाला दूध पुरेश्या प्रमाणात न मिळणे, वैद्यकीय गंभीर स्थितीत दुधाची कमतरता भासणे, आईकडून बाळाला दूध न मिळणे तसेच बाहेर जन्मलेल्या बाळासाठी आणि कामावर जाणाऱ्या मातांच्या बाळासाठी ह्युमन मिल्क बँक एक वरदान ठरले आहे. ही सेवा मोफत उपलब्ध असून गेली ५ वर्ष हा प्रकल्प डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या बालरोग विभागात कार्यान्वित आहे. यामध्ये आधुनिकता आणि नवनवीन तंत्रज्ञानासहित संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. मिल्क बँकमुळे नवजात बालकांमधील जंतुसंसर्गाचे प्रमाण ३० टक्केवरून ५ टक्केपर्यंत कमी करण्यात यश मिळाले आहे. दुधाची गुणवता, तपासणी, शुद्धीकरण, साठवण क्षमता आणि त्याचे व्यवस्थापन, संगणकीय तंत्रज्ञान आदी विकसित करण्यात आले असून प्रगत उपकरणाचा यात समावेश आहे.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुभाष जलसिंघानी, सेक्रेटरी जगमोहनसिंग भुर्जी, प्रकल्प समन्वयक रवी राजापूरकर, शुभांगी कोठारी आणि आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबचे डॉ. वीरपी हॉन्काला (फिनलँड) डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, कुलगुरू एन. जे. पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, अधिष्ठाता डॉ. जी एस भवाळकर, संचालिका-शैक्षणिक विभाग डॉ. वत्सला स्वामी, बालरोग विभाग प्रमुख डॉ. शरद आगरखेडकर आदी उपस्थित होते.

यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी म्हणाले, “माता आपले दूध बँकेत दान करते, ही सन्मानाची बाब आहे. तसेच ह्युमन मिल्क बँक गरजूना विनामूल्य सेवा देण्यात आम्ही कटिबद्ध आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात या उपक्रमामुळे नवजात बालकांना फायदाच होईल या सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम घेण्यात आला. तसेच ह्युमन मिल्क बँक गरजूंना विनामूल्य सेवा देण्यात आम्ही कटिबद्ध आहोत.

“यशोदा ह्युमन मिल्क बँक ही यशोदेचा कान्हा देवकीचा पान्हा’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करीत आहे” असे मत उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात दूध दान करणा-या मातांचा सन्मान करण्यात आला तसेच ह्युमन मिल्क बँकसाठी योगदान देणा-या व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.