Pimpri : महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध सामाजिक संस्थांनी राबविले नवनवीन उपक्रम

एमपीसी न्यूज- महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी रेल्वे स्टेशन येथे विविध समाजसेवी संस्थाकडून मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे. याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी त्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम आयोजियात करण्यात आले .या संस्थामार्फत वृक्ष संवर्धन, पर्यावरण बचाओ, प्लॅस्टिकमुक्त भारत, मतदान जनजागृती अशा वेगवेगळे उपक्रम साजरे करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हार्डीकर,पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील अधिकारी व कर्मचारी, डी. वाय. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी,स्थानिक नागरिक, रेल्वे कर्मचारी आदी उपस्थित होते

डी. वाय. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. सकाळी 5.30 वाजल्यापासून विद्यार्थी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतपासून झाली. यानंतर पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरातील कचरा संकलित करण्यात आला. पिंपरी रेल्वे स्टेशन स्वच्छ करून ते कायमस्वरूपी असेच ठेवू असा निर्धार देखील यावेळी करण्यात आला.

आगामी विधान सभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १०० टक्के मतदान व्हावे, या उद्देशाने मतदान जनजागृती करण्यात आली. रेल्वे स्टेशनवरील प्लॅस्टिक गोळा केले. प्लॅस्टिक मुक्त भारत करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

“पर्यावरण वाचवा, प्राण वाचावा” असे फलक घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेशही यावेळी देण्यात आला. पिंपरी -चिंचवड सिटीझन फोरम, आय वॉलेंटियर ग्रुप, आय बी एम वॉलेंटियर ग्रुप, पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभाग, अनिल रॉय अँड ग्रुप,पिंपरी रेल्वे स्टेशन कर्मचारी या संस्थांनी मिळून हा उपक्रम राबवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.