Pimpri: चौकशीत निर्दोष मात्र, विभागप्रमुखांच्या आग्रहास्तव लिपिकावर कारवाई; हर्डीकर प्रशासनाचा अजब कारभार

एमपीसी न्यूज – चौकशीत निर्दोष सुटल्यानंतरही पिंपरी महापालिकेच्या नागरवस्ती विभागप्रमुखांच्या आग्रहास्तव मुख्य लिपिकाला समज देण्यात आली आहे. यातून हर्डीकर प्रशासनाचा अजब कारभार समोर आला आहे. चौकशीत निर्दोष सुटल्यानंतरही कारवाई केल्याने कर्मचारी नाराजी व्यक्त करत आहेत.

भक्तीप्रसाद तरवडे यांना समज देण्यात आली आहे. तरवडे हे नागरवस्ती विकास योजना विभागमध्ये मुख्य लिपिक म्हणून कार्यरत होते. कार्यालयात आलेल्या नागरिकांना सौजन्यपूर्ण वागणूक न देता चढ्या आवाजाने सवांद करणे. सहका-यांशी वरिष्ठांशी उद्धटपणे व अरेरावीने बोलणे, कामकाजात दुर्लक्ष करत असल्याचे कारण देत तरवडे यांची खातेनिहाय चौकशी केली.

  • चौकशीत तरवडे यांच्याविरोधात ठेवलेले आरोप सिद्ध झाले नाहीत. चौकशीत ते निर्दोष सुटले. तथापि, विभागप्रमुख स्मिता झगडे यांनी तरवडे यांच्याकडून गैरवर्तन झाल्याने निदर्शनास आणून दिले. त्यांच्या आग्रहाने प्रशासनाने तरवडे यांना समज दिली आहे.

या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे. दरम्यान, चौकशीत निर्दोष सुटले असतानाही श्रावण हर्डीकर यांच्या प्रशासनाने कारवाई केल्याने प्रशासनाचा अजब कारभार समोर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.