BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांच्याकडून शहरातील कचरा समस्येची पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा संकलन आणि वहनाच्या कामाचे नियोजन विस्कटले आहे. शहरात सर्वत्र कचराकोंडी झाली आहे. महापालिका पदाधिकारी आणि अधिका-यांनी आज (गुरुवारी) कचरा समस्येची पाहणी केली. कचरा उचलण्याच्या सूचना अधिका-यांना केल्या आहेत.

सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, अतिरीक्त आयुक्त संतोष पाटील, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी पाहणी केली. सकाळी सहा वाजल्यापासून पाहणीला सुरुवात केली होती.  शहरातील रावेत, वाकड, डांगे चौक, पिंपळे निळख विकासनगर किवळे, पिंपळेगुरव, सांगवी या दाट लोकवस्तीच्या भागातील कचरा समस्येची पाहणी केली.

  • ज्या-ज्या ठिकाणी कचरा साचला आहे. कचरा कुंड्यातील कचरा उचलला नाही. तेथील कचरा तातडीने उचलण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने 1 जुलैपासून नवीन कंत्राटदारांमार्फत कचरा संकलन आणि वहनाचे काम सुरु केले आहे.

शहराचे दोन भाग करत उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना आणि दक्षिण भागाचे ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना कचरा संकलन आणि वाहून नेण्याचे काम देण्यात आले आहे. दोन्ही कंत्राटदारांना आठ वर्षांसाठी हे काम देण्यात आले आहे. दहा दिवस उलटून गेले. तरी, शहरातील कचरा समस्या मार्गी लागली नाही.

HB_POST_END_FTR-A2

.