Pimpri : कष्टकरी कामगार पंचायत अन्नछत्राची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी

Pimpri: MP Shrirang Barne visits Kashtakari Kamgar Panchayat Annachhatra

एमपीसी न्यूज – कष्टकरी कामगार पंचायत वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे अन्नछत्र किचन सुरू करण्यात आले आहे. अन्नछत्ररास मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट दिली आणि कष्टकऱ्यांनसाठी सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्राची पाहणी केली. बारणे यांनी यावेळी जेवण वाटप केले व कामगारांना सुरक्षित अंतराचे पालन करण्याचे आवाहन केले.

यावेळी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष  बाबा कांबळे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, उद्योजक नितीन टक्कर, विठ्ठल गायकवाड, बळीराम काकडे, प्रवीण कांबळे आदी उपस्थित होते.

रिक्षाचालक, बांधकाम मजूर, धुणी-भांडी स्वयंपाक, साफसफाई कामकरणाऱ्या महिला कागद-काच-पत्रा वेचक महिला, टपरी पथारी हातगाडी धारक आधी कष्टकरी जनतेचे लाॅकडाऊन मुळे हाल होत असून रोजगार बंद असल्यामुळे उपासमार होत आहे. यामुळे कष्टकरी कामगार पंचायत वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या साह्याने गोरगरिबांसाठी अन्नछत्र किचन सुरू करण्यात आलेले आहे. चपाती, भात, भाजी, वरण पॅकेटमध्ये बंद करून सुमारे दोन हजार व्यक्तींना जेवण वाटप केले जात आहे. यामुळे हाताला काम नसणाऱ्या असंघटित कामगारांची जेवण्याची व्यवस्था झाली आहे,

खासदार श्रीरंग बारणे यांनी याप्रसंगी उपक्रमासाचे कौतुक केले व कामगारांना जेवणाचे वाटप देखील केले. कामगारांनी गर्दी टाळत स्वयंशिस्त आणि सुरक्षित अंतराचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.