Pimpri: वैद्यकीय विभागाकडे अपुरा निधी; कोरोनासाठी वळविले 25 कोटी

वैद्यकीय विभागाअंतर्गत रूग्णालये, दवाखाने येथे हेल्थ स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित केली आहे. त्याकरिता जास्त खर्च अपेक्षित आहे. : Insufficient funding to the medical department; 25 crore diverted for corona

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी वैद्यकीय विभागाकडील अंदाजपत्रकातील लेखाशिर्षावर तरतुद अपुरी पडत आहे. त्यामुळे स्थायी आस्थापना या लेखाशिर्षातून कोरोनाविषयक कामांसाठी 25 कोटी 20 लाख रूपयांची तरतुद वळविण्यात आली आहे.

पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोना बाधीतांचा आकडा 27 हजारांच्या पुढे गेला आहे. दररोज कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शहरात 13 मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी वैद्यकीय विभागाकडील अंदाजपत्रकातील लेखाशिर्षावर तरतुद अपुरी पडत आहे. त्यामुळे इतर लेखाशिर्षातून तरतुद वर्ग करावी लागणार आहे.

वैद्यकीय विभागाअंतर्गत कोरोना विषाणूवर नियंत्रण व प्रतिबंध करण्यासाठी विविध रूग्णालये आणि दवाखान्यांकरिता दरमहा एकत्रित मानधनावर वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडीकल स्टाफच्या भरतीची प्रक्रीया सुरू आहे.

त्याकरिता अस्थायी आस्थापना या लेखाशिर्षावर जास्त तरतुद आवश्यक आहे.

कोरोना बाधीत रूग्णांवर नवीन भोसरी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच मोशी, बालेवाडी, आकुर्डी येथे कोरोना केअर सेंटर कार्यरत आहेत. कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने कोरोना केअर सेंटर आणि रूग्णालयांची संख्या वाढवावी लागणार आहे.

तसेच रूबी एल केअर कोरोना सेंटरची उभारणी केली जात आहे. या ठिकाणी ठेकेदार पद्धतीने साफसफाई करणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणुच्या रूग्णांमुळे जैव वैद्यकीय घनकच-यामध्ये वाढ झाली आहे. या जैव वैद्यकीय कच-याची त्वरीत विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. रूग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमधील वीजबीलातही गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे.

कोरोना केअर सेंटरमधील बाधीत रूग्ण, विलगीकरण आणि अलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणा-या रूग्णांना जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी जास्त खर्च अपेक्षित आहे.

कोरोना केअर सेंटरमध्ये रूग्णांची ने-आण करण्यासाठी राहते घर आणि महापालिका रूग्णालय अथवा कोरोना केअर सेंटर आणि इतर ठिकाणी रूग्णांची ने-आण करणे गरजेचे असते. त्याकरिता रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कोरोना साथीचा प्रादूर्भाव वाढल्यास आणखी वाहनांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे वाहन इंधन खर्चातही वाढ होणार आहे.

शहरातील बेघर, गरीब, निराधार, गरजू नागरिक आणि विद्यार्थ्यांना जेवणाची सोय करण्यासाठी त्यांना शिधावाटप करण्याकरिता वाहन दुरूस्ती कार्यशाळेमार्फत वाहने भाडेतत्वावर घेण्यात आली आहेत.

सर्व्हिलन्स टीमकरिता 50 वाहने 3 हजार 300 रूपये या दराने घेण्यात आली आहेत. त्याचा अंदाजे सहा महिन्यांकरिता 2 कोटी 97 लाख रूपये इतका खर्च अपेक्षित आहे.

तसेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या भाडेतत्वावरील रूग्णवाहिका आदी वाहनांचा खर्च वैद्यकीय विभागातील खासगी वाहन भाडे या लेखाशिर्षातून करण्यात येत आहे.

या लेखाशिर्षातील तरतुदीत वाढ करणे अपेक्षित आहे. वैद्यकीय विभागाअंतर्गत रूग्णालये, दवाखाने येथे हेल्थ स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित केली आहे. त्याकरिता जास्त खर्च अपेक्षित आहे.

कोरोना विषाणूवर नियंत्रण व प्रतिबंध करण्यासाठी सरकारकडील योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जास्त खर्च अपेक्षित आहे. त्याकरिता सरकारी योजनांची अंमलबजावणीसाठी या लेखाशिर्षावर तरतुद कमी पडत आहे.

लेखा विभागाकडील परिपत्रकानुसार, तरतुद वर्गिकरणाबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्तांसमवेत 19 मे रोजी कामकाज आढावा बैठक पार पडली. या बैठकीत लेखाशिर्षावर तरतुद वाढ करून घेण्याबाबत सुचना करण्यात आल्या.

त्यानुसार, स्थायी आस्थापना या लेखाशिर्षावर 58 कोटी रूपयांची तरतुद आहे. या तरतुदीपैकी 25 कोटी 20 लाख रूपये कोरोना विषयक कामकाजासाठी विविध विभागाच्या लेखाशिर्षावर वळविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.