Pimpri : डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी येथे ( Pimpri ) परिचारिकांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या आरोग्य सेवेमधील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ते 14 मे या कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. या विविध उपक्रमांच्या माध्यमातून परिचारिकांच्या कला गुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील मैत्री व जवळीक वाढावी तसेच दैनंदिन कामांमधून थोडा विरंगुळा मिळावा यासाठी हे कार्यक्रम घेण्यात आले.

सर्व परिचारिकांनी हिरीरीने सहभाग घेतला. पहिल्या दिवशी ‘माझे आरोग्य, माझे हक्क’ या थीम अंतर्गत भित्तीचित्र स्पर्धा व प्रदर्शन घेण्यात आली. दुसऱ्या दिवशी नर्सिंग विषयक प्रश्नमंजुषा – ‘कोन बनेगा ज्ञानपती’ आणि तंबोला सारखे मजेदार खेळ आयोजित केले गेले. तिसऱ्या दिवशी नृत्य व गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. चौथ्या दिवशी स्किट आणि कविता स्पर्धा, पाचव्या दिवशी फॅशन शो आणि स्टँड अप कॉमेडी आणि शेवटच्या दिवशी प्र कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या उपस्थितीत आणि सर्व परिचारिकांसमवेत संवाद सत्र झाले.

Chinchwad : दरोडा विरोधी पथकाची मोठी कारवाई; आयुक्तालयाच्या हद्दीतून गहाळ झालेले 70 मोबाईल शोधले

स्पर्धांमध्ये विजय मिळवलेल्या विजेत्यांना सन्मानचिन्ह, पदक, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विशेषतः विविध विभागातील 36 परिचारिकांना “सर्वोकृष्ट परिचारिका” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले  यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ एन. जे पवार, वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक विभागाच्या संचालिका डॉ. वत्सला स्वामी, महाविद्यलयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, अधिष्ठाता डॉ जितेंद्र भवाळकर, वैद्यकीय रुग्णलयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा करमरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण, परिचारिका विभागाच्या संचालिका नीलाक्षी श्रीवास्तवा आदी उपस्थित होते. रुग्ण परिचर्या क्षेत्राच्या प्रणेत्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ( Pimpri ) सर्व परिचारिकांनी शपथ घेतली.

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरीच्या परिचारिका विभागाच्या संचालिका नीलाक्षी श्रीवास्तवा म्हणाल्या या उपक्रमाचे नियोजन व ते पूर्णत्वास नेण्यासाठी मदत करणाऱ्या सहकारी आणि सहभागी सर्व परिचारिकांचे अभिनंदन केले. आपल्या कामामधून रुग्णसेवेशी असलेली निष्ठा सर्वांना प्रोत्साहन देते आहे. एक नियोजनबद्ध परिचर्या क्षेत्र हा भक्कम आरोग्य सेवा क्षेत्राचा एक अत्यावश्यक भाग असून त्यासाठी डीपीयू हॉस्पिटल आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देते आहे.”

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त शुभेच्छा देताना प्र कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील म्हणाल्या, “परिचारिका म्हणजे रुग्णाची काळजी घेणारे मन आणि आत्मा आहेत. त्यांचे परिश्रम आणि समाजाच्या सेवेसाठी देत असलेल्या योगदानासाठी सर्व प्रथम मी त्यांना धन्यवाद देते. आरोग्य सेवा क्षेत्रात परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावतात तसेच डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा ही असतात. दिवस असो वा रात्र, चेहऱ्यावर कोणतीही नाराजी न दर्शवता रुग्णांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करणाऱ्या परिचारिका या खऱ्या अर्थाने नायक असून त्या आरोग्य क्षेत्राचा महत्वाचा आधारस्तंभ आहेत.”

“रुग्णसेवेत परिचर्या क्षेत्र महिलांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या या क्षेत्रात आज पुरुष वर्ग ही आपले स्थान निर्माण करीत आहे हे अभिमानास्पद आहे याद्वारे आज सामाजिक संतुलन ही साद्य होत आहे. राजशाही जगणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल ने पीडित गरजू रुग्णांच्या सेवेत आपले आयुष्य खर्ची घातले हेच त्यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे” ही भावना कुलगुरू डॉ. एन. जे पवार यांनी ( Pimpri ) व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.