Pimpri : शहरात जागतिक योगदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज, शुक्रवारी जागतिक योग दिन विविध सामाजिक संस्था, शाळा यांच्यावतीने साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे सदस्य, नागरिक यांनी योगाभ्यासाचे धडे घेतले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कुदळवाडी येथे तात्यासाहेब सपकाळ क्रीडांगणावर योग प्राणायम शिबिर आयोजित करण्यात आले होते. आमदार पै महेश लांडगे युवा मंच कुदळवाडी आणि स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केले. सर्व नागरिकांनी योग शिबिराचा लाभ घेतला. किशोर माने, चंद्रशेखर हरकरे, राजेंद्र पाठक, किरण भिरुड, प्रवीण जांभळे, ओंकार होनप, रवींद्र होनप, रामकृष्ण लांडगे, प्रसाद मायभट्टे, गोरोबा शेळके, मनोज मोरे, विशाल उमाप, पोपट यादव, स्वप्निल पोटघन, अमित बालघरे, रामकुमार पासवान उपस्थित होते.

पिंपळे सौंदागर गोविंद यशदा चौक येथील शिव छत्रपती लिनियर अर्बन गार्डन येथे नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन, उन्नती सोशल फाउंडेशन, जयनाथ काटे युथ फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपयांच्या सहयोगातून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. नवचैतन्य हास्य क्लब, आनंद हास्य क्लब, सिनियर सिटीझन ग्रुपचे सभासद, तरुण वर्ग व शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, जयनाथ काटे, वसंत काटे, संजय भिसे, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षिका अनघा आठले, राजश्री राणे, डॉ.सौ.जया कोचुरे, प्रवीण कुंजीर, निलेश कुंजीर, गणेश झिजूर्डे, समीर देवरे, दीपक गांगुर्डे, गिरीश रोहिडा, संदेश काटे पाटील, कैलासभाऊ काटे उपस्थित होते. सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा संत निरंकारी सत्संग भवन भोसरी येथे योग प्राणायाम शिबिर घेण्यात आले. भोसरी, गंगाधाम, काळेवाडी, निगडी, जयजवान नगर, हडपसर, आळेफाटा, आव्हाळवाडी, नारायणगाव, मंचर, घोडेगाव, पेरणे-फाटा, नानगाव, तळेगाव या चौदा ठिकाणी हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १०० हुन अधिक नागरिक उपस्थित होते. प्रशिक्षक अनंत सकपाळ यांनी योगा, प्राणायामचे महत्व सांगितले तसेच योगाची प्रात्यक्षिके दाखवून प्रशिक्षण दिले. संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा अंगद जाधव यांनी भारतीय योग संस्थान च्या प्रशिक्षकांचा सत्कार करून त्यांचा गौरव केला. “विश्वशांतीचा एकच ध्यास, नित्य करूया योगाभ्यास!” असा सामुदायिक उद्घोष करीत विविध वयोगटातील सुमारे एकशे सत्तावीस स्त्री-पुरुषांनी मोठ्या उत्साहात योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला.

सहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून वीणा क्लबने यमुनानगर, निगडी येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. यावेळी नगरसेवक सचिन चिखले, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल आचार्य, वीणा क्लबच्या अध्यक्षा वैशाली दांगट उपस्थित होते. योगशिक्षक भाऊसाहेब गायकवाड आणि अमितेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने करण्यात आली. या दरम्यान “योगाभ्यास करा एक तास, मजेत घालवा दिवस खास!” , “नित्य करा योगासने, दिवस घालवा आनंदाने!” अशा सामुदायिक उद्घोषणा करण्यात आल्या. विश्वशांती प्रार्थनेने योग प्रात्यक्षिकांची सांगता करण्यात आली.

यावेळी नागरिकांमध्ये योगाभ्यासाची आवड निर्माण व्हावी यासाठी लकी ड्रॉ काढण्यात आला आणि त्यातील दहा भाग्यवान विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. मंगेश सूर्यवंशी, ज्योती खानेकर, प्रशांत मोकाशी, तुकाराम कालेकर यांच्यासह वीणा क्लबच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. राजाराम लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. मारुती दांगट यांनी आभार मानले.

शरद नगर येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू महाराज विद्यालयाच्या वतीने योगादिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन शिवाजी घोडे यांच्या हस्ते शाहू महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून केले. यावेळी बोधिसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड, सचिव लहू कांबळे, उपाध्यक्ष अंकुश कांबळे, मुख्याध्यापक बाबाजी शिंदे आदी उपस्थित होते.

योगाशिक्षक अर्चना सोनार, दर्शना शेट्टी, माधुरी पाटील, सुप्रिया देसाई, शिल्पा गाडेकर यांनी योगाचे प्रात्यक्षिके करून दाखवले तर अर्चना सोनार यांनी योगाचे महत्व सांगितले. सूत्रसंचालन स्वाती पाटील यांनी तर आभार विकास म्हस्के यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज कांबळे, देवेंद्र पाटील, दिनकर रनवरे, रूपाली पवार, सुजाता जोगदंड, कोमल गायकवाड, सुवर्णा आरोटे, दैवशाला चोले, पूनम सुरवसे, क्रीडाशिक्षक संतोष घरडे, जितेंद्र सूर्यवंशी, प्रमोद रायकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त योग प्रशिक्षक म्हणून गणेश कालापुरे, हर्षदा देशपांडे, सहकारी प्रशिक्षक प्रदीप खोले यांनी प्रात्यक्षिकासह योगा प्रशिक्षण दिले. तसेच विविध आसनांचे आरोग्याशी असणारे महत्त्व सांगितले. या योगा दिनानिमित्त महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या डॉ.मंजुश्री बोबडे, उपप्राचार्य डॉ.विलास सदाफळ, क्रीडासंचालक प्रा.बी.एस.पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुप्रिया पवार, ग्रंथपाल एकनाथ झावरे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अतुल चौरे, आय.क़्यु.ए.सी. चेअरमन डॉ.सविता पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षेकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी व औंध परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

चऱ्होली येथील गायत्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये आतंरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना योग अभ्यासाचे महत्व पटवून देण्यात आले. च-होलीतील क्रिस्टल इंग्लिश मिडियम स्कूल, गायत्री इंटरनॅशनलस्कूल, रॉक्सीट जीम, मोझे हायस्कूल येथे योगदिन साजरा कऱण्यात आला. यावेळी योग प्रशिक्षक रुपाली चासकर-गोरे यांनी योगाचे धडे दिले आणि योगाचे महत्व सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.