Pimpri : स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील कलावंताची शनिवारी प्रकट मुलाखत

एमपीसी न्यूज- दिशा सोशल फाऊंडेशनच्यावतीने दूरचित्रवाहिनीवरील लोकप्रिय मालिका स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेतील प्रमुख कलावंताची प्रकट मुलाखत होणार आहे, अशी माहिती दिशाचे अध्यक्ष गोरख भालेकर व कार्याध्यक्ष सचिन साठे यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

चिंचवड-वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये शनिवारी (दि.29) सायंकाळी साडेपाच वाजता मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेतील डॉ. अमोल कोल्हे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील शंतनू मोघे, झी मराठीचे बिझनेस हेड निलेश मयेकर, वरिष्ठ कार्यकारी निर्मात्या सोजल सावंत, लेखक प्रताप गंगावणे, दिग्दर्शक कार्तिक केंढे आदी सहभागी होणार आहे. प्रसिध्द मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे कलाकारांशी संवाद साधणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.