Pimpri: ‘पालिकेतील ‘कोरोना’ खरेदीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा’

Investigate corruption in Corona procurement

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना कोरोना उपायोजनेसाठीच्या मास्क, औषधे, यंत्रसामुग्री, वाररूम, फेसबुक लाईव्हत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. सीएसआर फंडातून मिळालेल्या पीपीपी कीट देण्यातही घोटाळा झाल्याचा आरोप करत कोरोना काळात झालेल्या खरेदीतील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

फडणवीस आज, मंगळवारी  पिंपरीत आले असता भापकर यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना  निवेदन दिले. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे कोरोना खरेदीतील चौकशी करण्याची मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कोरोना या महामारीत नागरिक जीवन मरणाशी झगडत असताना यामध्येही भ्रष्टाचार करणारे कोरोना विषाणू पेक्षाही  भयंकर विषाणू आहेत. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे.

पिंपरी चिंचवड शहरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून आणखीन काही दिवसाने ही महामारी या शहरात रौद्ररूप धारण करू शकते.

त्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार , महापालिकेचे वैद्यकीय विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांनी जनतेला सुरुवातीला जी मदत व उपाययोजना राबवल्या. त्यात खंड पडला असून यंत्रणा ढिम्म झाली आहे.

त्या अधिक सतर्क करून कार्यान्वित होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याबद्दलही आपण विरोधी पक्षनेते म्हणून आवाज उठवावा, अशी विनंती  भापकर यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.