Pimpri : निवडणुकीतील ‘ती’ किड काढून टाकण्याची वेळ आली – नितीन नांदगावकर

एमपीसी न्यूज – भाजप मतासाठी जवानांचा मुद्दा पुढे करत आहे .सैनिकांच्या मुद्द्यांवर भाजप सरकार खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहे . हि किड काढून टाकण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे, असे मत मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी काल चिंचवड येथे व्यक्त केले.

चिंचवड येथील आहेर गार्डन येथे मोदी मुक्त भारतासाठी शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मनसेचा मेळावा घेण्यात आला.

  • यावेळी मनसेचे नेते बाबु वागस्कर, गणेश आप्पा सातपुते, रणजित शिरोळे, किशोर शिंदे, रुपेश माहळस्कर, दिपक हुलावळे, देहुरोडचे अध्यक्ष मोजेस दास, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला अध्यक्षा अश्विनी बांगर, बाळा दांनवले, राजु साळवे, अंकुश तापकिर , विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे, सचिव रुपेश पटेकर, सहसचिव सिमा बेलापुरकर , विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, संजय यादव ,मयुर चिंचवडे, शाम जगताप , विशाल मानकरी, राहुल जाधव, अनिता पांचाळ ,संगिता देशमुख, स्नेहल बांगर, रुपाली गिलबिले, सुजात काटे, विद्या कुलकर्णी ,अदिती चावरीया , सुनिता गायकवाड , मीना गटकळ, नितीन चव्हाण , पंकज दळवी, ओकांर पाटोळे, मिलिंद सोनवणे ,गुरूनाथ शिंगारे ,अजय कुदळे, रवी सुर्यवशी , सचिन कळकुभे,निलेश नेटके,सचिन कांबळे,सुरेश सकट,राम दहिफळे,फयाज नदाफ, तेजस दाते ,गणेश लोणारे,स्वप्निल दरे,प्रतिक जिते, सतोष जाधव , सखाराम मटकर, सचिन मिरपगार,अक्षय करडे,उत्कर्ष भोसले,नाथा शिंदे , सिध्दराम कोळी,गणेश पाटील, नारायण पठारे महेंद्र यादव,सुशांत साळवी आदी उपस्थित होते.

यावेळी नितीन नांदगावकर पुढे म्हणाले, भारतावर जागता पहारा देण्याची वेळ आली आहे. कारण चौकीदार चोर आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन जोड गोळी मुक्त करुया, मोदी मुक्त भारत करुया, असा नारा यावेळी देण्यात आला.

  • त्यानंतर गणेश सातपुते म्हणाले, मनसे जरी निवडणूक लढवित नसली तरी मनसेची राज्यभर जोरदार चर्चा आहे. मनसेमध्ये प्रत्येक कार्यकर्तांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे.

मनसेचे राजेंद्र वागस्कर म्हणाले, शहरात मनसेची चांगल्या प्रकारे पक्षबांधणी सुरु आहे. मनसे आपल्या दारी उपक्रमाची अंमलबजावणीचे कौतुक केले. रणजित शिरोळे म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये मनसेची संख्या वाढत चालली आहे. शहरातील जलपर्णी चा विषय, मेट्रोचा विषय,वाढत चाललेली वाहतुककोंडी या प्रमुख विषयाला घेऊन मनसे रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.