एमपीसी न्यूज – शहरात सोमवारी मध्यरात्रीपासून 23 जुलैपर्यंत सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये निर्बांधासह काही सेवा सुरु राहणार आहेत.

निर्बांधासह ‘या’ सेवा सुरु राहणार

#दूध विक्री, दुधाचे घरपोच वितरण,

#वैद्यकीय सेवा, मेडिकल, ऑनलाईन औषध वितरण,

#शासकीय कार्यालये 10 टक्के कर्मचा-यांची उपस्थिती, शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम

#अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी पेट्रोल पंप सकाळी 9 ते दुपारी दोन या वेळेत सुरु राहणार

#गॅस वितरण घरपोच सेवा सुरु राहणार

#औद्योगिक, इतर वस्तुंची पुरवठा करणारी वाहतूक सुरु राहील

#वर्तनमानपत्रे, छपाई, वितरण सेवा सकाळी 6 ते 9 या वेळेत

#पाणीपुरवठा करणारे टँकर

#बँका किमान मनुष्यबळासह सुरु राहतील

#बँक, न्यायालयीन कर्मचारी, शासकीय कर्मचारी, पत्रकार, दूध विक्रेते, गॅस वितरक, पाणीपुरवठा, पावसाळ्या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी

# चारचाकी, दुचाकी वाहन वापरण्यास परवानगी, ओळखपत्र बाळगणे बंधनकारक

#पालिकेची स्मार्ट सिटी, मेट्रो, राष्ट्रीय महत्वाचे प्रकल्प सुरु राहणार

#कंपन्यांतील कामगारांना पालिकेकडून ई-पास घेणे बंधनकारक, बसने वाहतूक बंधनकारक

#आयटी क्षेत्र 15 टक्के क्षमतेसह सुरु राहतील

#शेती मालाशी निगडीत कामे सुरु राहतील