Pimpri: चिंचवडमध्ये उद्या मंचावर साकारणार ‘जालियनवाला बाग’ हिंदी नाटक

एमपीसी न्यूज – नवीन पिढीला ‘जालियनवाला बाग’च्या इतिहासाची माहिती व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या सांस्कृतीक विभागाच्या वतीने देशभरात ‘जालियनवाला बाग’ हे नाटक दाखविले जात आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहयोगाने उद्या (बुधवारी) शहरवासियांना हे हिंदी नाटक मोफत पाहायला मिळणार आहे. याबाबतची माहिती महापालिकेचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे यांनी दिली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात बुधवारी सायंकाळी सात वाजता 30 कलाकार ‘जालियनवाला बाग’ हे हिंदी नाटक सादर करणार आहेत.

‘जालियनवाला बाग’ या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त नवीन पिढीला त्याचा इतिहास माहिती व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारच्या सांस्कृतीक विभागातर्फे देशभरात ‘जालियनवाला बाग’ हे हिंदी नाटक सादर केले जात आहे. सांस्कृतीक मंत्रालय भारत सरकार यांचा हा उपक्रम आहे. सरकारच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर या केंद्राच्या वतीने देशभरात हे हिंदी नाटक दाखविले जात आहे. त्यांची 30 कलाकारांची टीम हे हिंदी नाटक सादर करत आहे.

त्यानुसार पिंपरी-चिंचवडकरांना ‘जालियनवाला बाग’चा इतिहास जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. सर्वांसाठी या हिंदी नाटकाला प्रवेश विनामूल्य आहे. त्यामुळे शहरवासियांनी मोठ्या संख्येने नाटकाला उपस्थित राहण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.