Pimpri: ‘भीमसृष्टी’च्या उद्घाटनाचा खर्च अधिका-यांकडून वसूल करण्याची जनक्रांती सेनेची मागणी

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारलेल्या भीमसृष्टीचे नियोजित उद्घघाटन पुढे ढकल्यामुळे त्याच्यावरील अवाढव्य खर्च वाया गेला आहे. हा खर्च करदात्यांच्या पैशांतून न करता अधिका-यांकडून वसूल करण्याची मागणी जनक्रांती सेनेने केली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते शनिवारी (दि. 7) उदघाटन केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, कार्यक्रमाच्या नियोजनाअभावी त्यांना वेळ देता आला नाही. त्यामुळे उदघाटनासाठी टाकलेल्या मांडव, विद्युत रोषणाई काढावी लागली. त्याचा करदात्यांच्या पैशांवर नाहक भार पडतो. त्यामुळे करदात्यांच्या पैशांतून हा खर्च करु नये.

कार्यक्रमाची जबाबादारी ज्या अधिका-यांनी घेतली होती. त्यांच्या वेतनातून हा खर्च वसूल करण्यात यावा. अर्धवट माहितीच्या आधारे काम पूर्ण झाल्याचे सांगणा-या अधिका-यावर कारवाई करण्याची मागणी जनक्रांती सेनेचे अध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.