BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: भर पावसात ढोलच्या दणदणाटात पिंपरीत ‘जवाब दो’ आंदोलन (व्हिडिओ)

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा आज पाचवा स्मृतिदिन

एमपीसी न्यूज – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला आज (सोमवारी) पाच वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, पाच वर्ष होत आले तरी दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पकडण्यात अद्यापही यश आले नाही. याचा सरकारला जाब विचारण्यासाठी समता सैनिक दलातर्फे पिंपरीत भर पावसात ढोल-ताशाच्या दणदणाटात ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज (सोमवारी) हे आंदोलन झाले. यामध्ये समता सैनिक दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘हू किल्स द दाभोळकर, जवाब दो, जवाब दो’, ‘हू किल्स द पानसरे, जवाब दो, जवाब दो’, ‘हू किल्स द कलबुर्गी, जवाब दो, जवाब दो’, ‘हू किल्स द गौरी लंकेश, जवाब दो, जवाब दो’,”मारेकरी घडविणा-या मेंदूवर कारवाई करा’, ‘सरकार हमे डरती है, पोलीस को आगे करती है’ अशा जोरदार घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. तसेच दाभोळकर यांचा स्मृतिदिन आला की सरकार मारेकरी पकडल्याचे दाखवून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप, यावेळी आंदोलकांनी केला. त्यानंतर आंदोलकांनी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

दरम्यान, नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला आज, पाच वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच कॉमेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला देखील साडेतीन वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय यांनी तब्बल पाच वर्षानंतर दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीला जेरबंद केले आहे. मात्र मुख्य आरोपी शोधण्यास तपास यंत्रणांना अजून यश आलेले नाही. या दिरंगाईचा जाब शासनाला विचारण्यासाठी महाराष्ट्र अंनिस ‘जवाब दो’ आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आज दिवसभर पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विविध निषेध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement