Pimpri : डॉ. जया उभे यांचा ‘मानव विकास सन्मान 2018-19’पुरस्कारने गौरव

एमपीसी न्यूज – मानव विकास बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, गुरधाळ (ता. देवणी, जिल्हा लातूर) या संस्थेच्या वतीने ‘मानव विकास सन्मान 2018-19’ पुरस्कार डॉ. जया उभे यांना प्रदान करण्यात आला.

दरवर्षी समाजात शैक्षणिक, सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना “मानव विकास सन्मान” हा राज्यस्तरीय पुरस्कार देणेत येतो. संस्थेचे अध्यक्ष सरोजा वसंत घोगरे (पाटील) यांच्या हस्ते त्यांना लातूर येथील दयानंद सभागृहात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला.

डॉ. ॲड. जया उभे यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेत नुकतीच दिल्ली येथील विश्वकर्मा युनिव्हर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. तसेच यासाठीही समाजातील सर्व स्तरातून ॲड. जया उभे यांचे अभिनंदन होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2