Pimpri : पीएमपी बस प्रवासादरम्यान दीड लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – पीएमपी बसने प्रवास करत असताना एका (Pimpri) महिलेचे दीड लाखांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 29) सायंकाळी सव्वा सहा ते आठ वाजताच्या कालावधीत बालाजीनगर धनकवडी ते आंबेडकर चौक पिंपरी या मार्गावर घडली.

याप्रकरणी महिलेने बुधवारी (दि. 31) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra : क्षमता नसणारे लोक ‘क’ पदार्थ बुद्धिमत्ता असणारे – सुषमा अंधारे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोमवारी सायंकाळी सव्वा सहा ते आठ वाजताच्या कालावधीत बालाजीनगर धनकवडी ते आंबेडकर चौक पिंपरी या मार्गावरून पीएमपी बसने प्रवास करीत होत्या.

त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.