Pimpri: पालिकेच्या मुख्य लेखापालपदी जितेंद्र कोळंबे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य लेखापालपदी जितेंद्र विश्वनाथ कोळंबे हे रुजू झाले आहेत. त्यांना आज (गुरुवारी) रुजू करुन घेण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रतिनियुक्तीवरील मुख्य लेखापाल राजेश लांडे यांची 24 ऑगस्ट रोजी बढतीने मुंबईत बदली झाली आहे. मुंबईतील प्राथमिक शिक्षण परिषदेच्या (वित्त व लेखा)सहसंचालकपदी त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक यांची पालिकेच्या मुख्य लेखापालपदी वर्णी लागली होती.

बदली झालेल्या लांडे यांनी आज पालिकेतून कार्यमुक्त करण्यात आले. तर, त्यांच्या जागी वर्णी लागलेल्या जितेंद्र कोळंबे यांना रुजू करुन घेण्यात आले. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.