Pimpri : युवासेनेच्यावतीने यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील परिचारिकांचा सत्कार

एमपीसी न्यूज – जागतिक परिचारिका दिनानिमित्त पिपंरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या परिचारिकांचा पिंपरी चिंचवड युवा सेनेच्या वतीने करण्यात आला .

या वेळी प्रमुख मेट्रन परिचारिका मोनिका चव्हाण, असिस्टंट मेट्रन श्रीमती माया गायकवाड, पिपंरी चिंचवड नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा सविता निगडे , सुपर सिस्टर पुष्पा लाड, विजया रोकडे व स्मिता शेटे यांचा व सर्व परिचारिकानचा सन्मान करण्यात आला. यावेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे पिंपरी विधानसभा युवा अधिकारी अभिजित गोफण, पिंपरी विधानसभा युवती अधिकारी प्रतीक्षा घुले, चिंचवड युवती अधिकारी शर्वरी जळमकर , नीलेश हाके, निखिल येवले पाटील, वंदना खंडागळे सन्नी कड,पुरू पाटील, ज्येष्ठ शिवसेनिक बाबा वानखेडे आणि शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना जितेंद्र ननावरे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या काळात सर्वांना तातडीची सेवा हवी असते. डॉक्टरांननंतर रुग्णाची सेवा परिचारिका करतात. रुग्णांना सेवा अतिशय चोखपणे देण्याच काम परिचारिका करत असतात. पण तरीही शासकीय रुग्णालयात खुप काम करूनही त्यांच्यावर रुग्णाचे नातेवाईक व राजकीय मंडळी काम करत नसल्याचे खोटे आरोप करत असतात .पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्या मोठ्या आदराने रुग्णसेवा करत असतात. परिचारिकानां काही अडचण असल्यास आपण आवाज दिल्यास युवासेना नेहमीच परिचारिकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे त्यांनी आश्वासन दिले. आभार मोनिका चव्हाण यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.