Pimpri : भाजप सोशल मीडिया प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी जोगिंदर डुमडे

एमपीसी न्यूज- भाजप सोशल मीडिया प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी देहूरोडचे जोगिंदर जगदीश डुमडे यांची निवड करण्यात आली. कामगार, पर्यावरण राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी जोगिंदर डुमडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून पक्षाच्या प्रदेश सोशल मीडिया संयोजकपदी नाशिकचे प्रवीण काशिनाथ आलाय आणि प्रदेश प्रभारीपदी मुंबईचे जितेन गजारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेश सोशल मीडियाच्या प्रदेश संयोजकपदी मुंबईचे प्रतीक कर्पे, तर विभागीय संयोजकपदी अमरावतीचे अक्षय जव्हेरी, पुण्याचे पियुष काश्यप, परळी वैजनाथचे अनीश अग्रवाल, ठाण्याचे स्वानंद गांगल, मुंबईचे समीर गुरव, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे समीर अंबोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समन्वयकपदाची जबाबदारी नागपूरचे अंकित कुलकर्णी ठाण्याचे अॅड महेश शर्मा यांना देण्यात आली आहे.

सदस्यपदी जोगिंदर डुमडे, शरद पाटील, परेश जोशी, सागर फुंडकर, संकेत कुलकर्णी, गिरीश नारखेडे, राकेश कोंडबुटूंवार, विशाल शिंदे, रवींद्र नाठे, अॅड. राखी बारोड, अनघा पुरोहित व विशाल गोरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.