Pimpri : जायंट किलर म्हणत मुख्यमंत्र्यांनी केले श्रीरंग बारणे यांचे कौतुक

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून दणदणीत मताधिक्याने निवडून येत खासदार श्रीरंग बारणे यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पवार कुटुंबातील सदस्याचा पराभव करत शिवसेना-भाजप महायुतीचे बारणे जायंट किलर ठरले आहेत. बारणे यांच्या या विजयाने इतिहास घडविला असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक विजयानिमित्त बारणे यांचे अभिनंदन केले.

निवडून आल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. 27 ) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भाजपने केलेल्या मदतीबाबत त्यांचे आभार मानले. यावेळी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II
  • मावळ लोकसभा मतदारसंघातून बारणे यांनी पवार घराण्यातील उमेदवाराचा दारुण पराभव केला. पवार कुटुंबातील सदस्याचा तब्बल दोन लाख 15 हजाराच्या मताधिक्याने पराभव केला. एवढ्या मोठ्या मताधिक्याने पराभव केल्याने बारणे राज्यभर चर्चेत आले आहेत. बारणे जाइंट किलर ठरल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मतदारसंघातील कोणत्याही कामासंदर्भात राज्य सरकार तुमच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

निवडणुकीच्या काळात मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून प्रचार केला. सर्वांनी जीवाचे रान करत प्रचार केला. शिवसेना-भाजप-आरपीआय मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत केल्याने बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.