Pimpri : नागझिराच्या अभिवाचनाने घडवली जंगल सफर

एमपीसी न्यूज – व्यंकटेश माडगुळकर लिखित “नागझिरा” या प्रवास वर्णनाचे अभिवाचन तळेगाव येथील फ्रेंड्स ऑफ नेचरच्या निसर्गरम्य परिसरात करण्यात आले. संध्याकाळच्या अदभूत छायेत अगदी साधेपणाने अभिवाचनाचा प्रयोग झाला. नागझिराच्या जंगलात भ्रमंती केल्याचा अनुभव यावेळी रसिकांनी घेतला. विराज सवाई आणि डॉ. विनया केसकर यांनी आपल्या वाचनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रसन्न जोशी यांनी ध्वनी संयोजन केले होते.

कथावस्तू, परिसर आणि श्रोते यांच्या मधील एकतानता या प्रयोगात अनुभवायला मिळाली. नागझिरा मध्ये वर्णन केलेल्या काही गोष्टी नेपथ्य म्हणून वापरून व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिलेले अनुभव जिवंत करण्यात आले होते.

कंदील, घोंगडी, पायवाट, पाणी पिण्याचे तांब्याचे गडू, वाचनासाठी निवडलेली जागा, प्रयोगातला साधेपणा, वाचनाचे सामर्थ्य या माध्यमातून श्रोत्यांना नागझिराची सफर घडवून आणण्यात कलाकार यशस्वी झाले.

अभिवाचनाची ही अभिनव कल्पना रसिकांना खूप आवडली. असे प्रयोग अधिकाधिक व्हावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.  फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष विवेक रामायणे व सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.