Pimpri : श्रीराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी केतन दाभाडे बिनविरोध

एमपीसी न्यूज – श्रीमंत सरदार दाभाडे यांच्या मालकीच्या श्रीराम मंदिरात दरवर्षी रामजन्म जयंती मोहोत्सव साजरा करण्यात येतो. जयंती मोहोत्सवाच्या अध्यक्षपदी केतन दाभाडे यांची बिनविरोध निवड करण्यात अली आहे. तर अक्षय दाभाडे आणि अक्षय गारगोटे यांची उपाध्यक्षपदी निवड केली आहे.

रामजन्मत्सोव नियोजनासाठी झालेल्या या बैठकीला माजी अध्यक्ष विशाल दाभाडे, कार्याध्यक्ष तुषार सावंत, सागर दाभाडे,सुनील दाभाडे उपस्थित होते.

समितीच्या खजिनदार पदावर रोहित धोपटे व प्रणव दाभाडे, सहखजिनदार मयूर शिंदे व गौरव तापकीर यांची तर चिटणीस पदावर विजय दाभाडे व सौरभ दाभाडे तर सहचिटणीसपदावर मयूर भोसले व अक्षय शेलार यांची निवड करण्यात आली आहे.

रामनवमी निम्मित दरवर्षी श्रीराम पादुकांची पालखीतुन मिरवणूक काढण्यात येते. तसेच भजन कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते, अशी माहिती प्रसिद्धीप्रमुख ऋषिकेश ठोंबरे आणि अनिकेत दळवी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.