BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : केतन सावंत तबला अलंकार परीक्षेत प्रथम

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचा दिक्षांत समारंभ आणि पुरस्कार वितरण सोमवारी (दि. ६मे) मुंबई वाशी येथे पार पडला. केतन अंकुश सावंत हा तबला अलंकार परीक्षेमध्ये भारतात प्रथम क्रमांक मिळाला.

केतन हा सुप्रसिध्द तबला वादक किशोर कोरडे यांचा शिष्य आहे. या पुरस्कार समारंभात केतनला उस्ताद इनाम अली पुरस्कार तथा कै. विष्णू भिकाजी माईणकर पुरस्कार, हरी ओम ट्रस्ट वाद्य प्रथम पुरस्कार, श्री गुरुदेवजी पटवर्धन आदी पुरस्कार तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

  • यावेळी डॉ. विकास कशाळकर, मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर भांडारे, पांडुरंग मुखडे आदी उपस्थित होते.
HB_POST_END_FTR-A2

.