Pimpri: कोरोनामुळे खडकीतील महिलेचा वायसीएममध्ये मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या खडकीतील 50 वर्षीय महिलेचा आज (बुधवारी) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहराबाहेरील दोन आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तीन अशा पाच जणांचा आजपर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे.

खडकी परिसरातील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. या महिलेवर पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज या महिलेचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने आजपर्यंत पाच जणांचे बळी घेतले आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील दोन आणि शहरातील तिघांचा समावेश आहे.

रविवारी (दि.12 एप्रिल) थेरगाव भागातील एका पुरुषाचा, सोमवारी (दि.20) निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण, वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि शुक्रवारी (दि. 24) निगडीतील एका पुरुष रुग्णाचा अशा चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आज बुधवारी (दि.29) खडकीतील रहिवासी पण, महापालिका रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पिंपरी महापालिका हद्दीबाहेरील चार जणांना आज कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 11 वर्षाचा मुलगा आणि 46 वर्षांचा पुरुष तर 5 आणि 11 वर्षाच्या मुलींचा समावेश आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.