Pimpri Crime News : बहिणीसोबत लग्न केले नाही म्हणून तरुणाचे अपहरण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बहिणीसोबत लग्न केले नाही म्हणून भावाने आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून एका तरुणाचे अपहरण केले. ही घटना शनिवारी (दि. 10) दुपारी चार वाजता नवमहाराष्ट्र शाळेसमोर घडली.

श्रेयस वाघमारे (वय 22, रा. पिंपरी) आणि त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विष्णू श्रीपती साळवे (वय 51, रा. पिंपरी) यांनी रविवारी (दि. 11) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साळवे यांचा मुलगा आकाश याने आरोपी श्रेयस याच्या बहिणीसोबत लग्न केले नाही. या कारणावरून श्रेयस आणि त्याच्या दोन साथीदारांनी आकाशला मारहाण केली.

त्यानंतर जबरदस्तीने कारमधून त्याचे अपहरण केले. आकाशच्या जीवाचे बरेवाईट करण्याच्या उद्देशाने त्याला पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.