Pimpri : सह्याद्री रांगेतील हिरकणी करणार माऊंट किलीमांजारो शिखर सर

एमपीसी न्यूज – हर्षाली वर्तक येत्या 18 जानेवारीला माऊंट किलीमांजारो शिखऱ सर करणार आहे. माउंट किलीमांजारो हा आफ्रिका खंडातील सर्वात उंच पर्वत टांझानिया देशाच्या ईशान्य भागात केनियाच्या सीमेजवळ स्थित पर्वताची उंची 19,341 फूट (5,895 मी) सर करण्यासाठी हर्षाली निघाली आहे.

या बाबत माहिती देताना ती म्हणाली, 1994 साली प्रथम चिंचोती धबधबा येथे ट्रेकला सुरुवात केली . युथ होस्टल इंडिया या संस्थेमार्फत तिने प्रथम हिमालयातील ट्रेकला सुरुवात केली. या तिच्या मोहिमेत 12 जणांनच्या टीमचे नेतृत्व करणार आहे तिच्या जोडीला कॅप्टन बिजॉय हे तिला मदत करणार आहेत,  भारत आणि विदेशातील गिर्यारोहकांचा या टीम मध्ये सहभाग असणार आहे .

सह्याद्री पर्वत रांगेतील अनेक गड कळसुबाई, नाणेघाट, लोहगड, हरिचंद्रगड, राजगड, तोरणा, कलावंतीन असे ट्रेक केले आहेत. तसेच हिमालयातील  अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने माउंट फ्रेंडशिप पीक ( 5289 मिटर ),माउंट हनुमान तीब्बा ( 5990 मिटर) माउंट युनान ( 6118 मिटर ), माउंट मेन्थोसा ( 6443 मिटर ),माउंट फुजी ( 3776 मिटर),या शिखरांचा समावेश आहे. तसेच एन.आय.ऐम या संस्थेकडून माऊंटनियरिंगची पदवी मिळवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.