_MPC_DIR_MPU_III

Pimpri: शहरातील नागरिकांची कोविड पूर्व चाचणी आता बसमध्ये होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका आणि क्रिस्ना डायग्नोस्टीक  यांच्या सहकार्याने कोविड पूर्व चाचणी वस्ती पातळीवर जाऊन बसमधील प्रयोग शाळेत घेण्यात येणार आहे. त्यासाठी  अत्याधुनिक प्रयोगशाळा विकसित करण्यात आली असून त्याचा शुभारंभ महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज (बुधवारी) महापालिका भवनात करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_IV

कोविड – 19 बस  प्रयोगशाळा ही पिंपरी-चिंचवड शहरातील पहिली अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे. प्रयोगशाळा वस्ती पातळीवर जाऊन काम करणार असून याव्दारे कोविड – 19 पूर्व चाचणी, मोबाईल एक्सरे, रक्त तपासणी व रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे. यामार्फत जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्राथन्याने कंटेन्मेंट झोनमधील हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील नागरिक व दुर्धर आजाराने त्रस्त व जेष्ठ नागरिकांची कोवीड पूर्व चाचणी या प्रयोगशाळेत विनामूल्य करण्यात येणार आहे.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर,  स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, इ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, नगरसदस्या भिमाताई फुगे, सोनाली गव्हाणे, अश्विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, क्रिस्ना डायग्नोस्टीकच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन, कार्यकारी अधिकारी अनिल साळुंके, वैद्यकीय विभागाचे संचालक डॉ. किरणकुमार भिसे उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.