Pimpri : महिला उमेदवारांना मिळाली अवघी साडेपाच टक्के मते

एमपीसी न्यूज – पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या चार विधानसभा मतदारसंघातून अवघ्या सहा महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, झालेल्या एकूण मतदानाच्या अवघी 6 टक्के मते महिलांना मिळाली आहेत. विशेष म्हणजे एकाही महिला उमेदवाराला स्वतःचे डिपॉझिट वाचविता आले नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेसह मावळातील ग्रामपंचायतींमध्ये 50 टक्के महिलाराज आहे. मात्र, मावळसह पिंपरी-चिंचवड कामगारनगरीची पहिल्या महिला आमदाराची आस अद्यापही कायम आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचा टक्का कमी असला तरी महिलांची संख्या आणि त्यांचे प्रश्‍न आजही कायम आहेत.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी नाकारली. राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी विधानसभा मतदार संघातून नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांना जाहीर केली उमेदवारी कापली. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात तुल्यबळ अशी एकही महिला उरली नाही.

चार मतदार संघातील एकूण 48 उमेदवारांपैकी 6 महिला उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. मात्र, त्यांचा म्हणावा तसा बोलबाला निवडणुकीत झाला नाही. शहरातील उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत अवघी 6 टक्के मते या महिला उमेदवारांना मिळाली आहेत. त्यामुळे एकाही महिलेची निवडणुकीची अनामत रक्कम (डिपॉझिट) वाचू शकली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.