Pimpri : ओटीपी नंबर घेऊन तरुणाची लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज – क्रेडीट कार्डाचा उपयोग करण्यासाठी ओटीपी क्रमांक घेऊन एका तरुणाची एक लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे घडली.

चंदन दीपक लालवाणी (वय 23, रा. अशोक थिएटरच्या मागे, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि. 18) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी यांना आपल्या मोबाइलवर फोन केला. आरोपीने फिर्यादी यांना ओटीपी क्रमांक देण्यास भाग पाडून त्याद्वारे सुमारे 99 हजार 998 रुपयांची फसवणूक केली. याबाबत अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.