Pimpri : पिंपरीत सिंधी बांधवानी साजरा केला लाल लोई उत्सव

एमपीसी न्यूज- विश्व सिंधी सेवा संघमच्या वतीने पिंपरीमध्ये पहिल्यांदाच सार्वजनिक लाल लोई हा उत्सव साजरा करण्यात आला.

काळेवाडी येथे राधेश्याम गोशाला येथे हा उत्सव झाला. या महोत्सवामध्ये पिंपरीतील सिंधी बांधवांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला विश्व सिंधी सेवा संघमचे आंतरराष्ट्रीय संचालक भारती छाब्रीया, गोपाल सजनानी, उषा सजनानी आदी उपस्थित होते.

यावेळी लाल लोई मातेचे पूजन करुन समाजामधील वाईट परंपरा व वृत्ती नष्ट व्हाव्यात अशी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाचे आय़ोजन संस्थेच्या गीता तिलवानी, विजय कोटवानी, किरण रामनाणी, कांचन रामनाणी, हरेश छबलाणी, दिलीप मदानी, नारायण नाथाणी, अजित कंजवाणी, इंदर वाणवाणी, मनोहर जेठवानी, जॉनी थडाणी, पेहलाज लोकवाणी यांनी केले. या महोत्सवाला छतुराम बाबालाल मंदिर व राधेशाम गोशाला यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.