BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: लँडमाफिया विलास नांदगुडे यांच्यासारख्या प्रवृत्तीला भाजपमध्ये थारा नाही -अमोल थोरात

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज –  भारतीय जनता पक्षाने गुंड, लँडमाफिया, भ्रष्टाचारी अशा प्रवृत्तींना कधीही थारा दिलेला नाही. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विलास नांदगुडे यांच्यामध्ये अशा सर्व प्रवृत्ती असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यांनी बँक, पंतसंस्था बुडविल्या. जमिनीच्या अनेक प्रकरणात त्यांनी गफला केलेला बाहेर आला आहे. फ्लॅटसाठी पैसे घेऊन त्यांनी अनेकांना टोपी टाकल्याचे समोर आल्याचा आरोप करत नांदगुडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे दिवास्वप्न पाहू नये, अशी टीका भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी केला आहे. 
अमोल थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ”भाजपने कधीही चुकीच्या आणि समाजविघातक प्रवृत्तींना पक्षात थारा दिलेला नाही. अशा प्रवृत्तीच्या लोकांना भाजपमध्ये स्थान नाही. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विलास नांदगुडे यांची पिंपळेनिलख परिसरात काय प्रतिमा आहे, हे सर्व पिंपरी-चिंचवडकर जाणून आहेत. नांदगुडे यांची बँक व पतसंस्था होती. त्यांनी बँकही बुडविली आणि पतसंस्थाही. त्यांच्या बँक आणि पतसंस्थेत विश्वासाने ठेव ठेवलेल्या ठेवीदारांना नांदगुडे यांनी देशोधडीला लावले”.
  • बिल्डरचा व्यवसाय करताना सर्वसामान्यांकडून पैसे घेऊनही फ्लॅट दिले नाहीत. एकाच जागेची अनेकांना विक्री करण्याचा गोरखधंदा त्यांनी केला. त्यातून त्यांनी बक्कळ माया कमावली. परंतु, चुकीचा मार्ग अवलंबणा-यांचे काय होते, ते नांदगुडे यांच्याकडे पाहिल्यानंतर स्पष्ट होते. नांदगुडे यांना जेलचीही हवा खावी लागली. गुंड, लँडमाफिया, भ्रष्टाचारी हे सर्व गुण नांदगुडे यांच्यामध्येच असल्याचे या सर्व प्रकरणांवरून दिसून येते, असा हल्लाबोल थोरात यांनी केला आहे.
HB_POST_END_FTR-A4

.