Pimpri: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे ‘लॅपटॉप, कॉम्प्युटर’ला वाढती मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयटी कंपन्यांतील सर्व कर्मचा-यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्यात आली आहे. इतर कंपन्यांनी देखील 50 टक्के कर्मचा-यांनाच कामावर बोलवावे, अशा सरकारच्या सूचना आहेत. त्यामुळे घरुन काम करणा-यांची संख्या वाढल्याने नवीन ‘लॅपटॉप, कॉम्प्युटर’ला मागणी वाढली आहे. कंपन्यांकडून, वैयक्तिक देखील ‘लॅपटॉप’ भाड्याने मागितले जात आहेत. ‘कॉम्प्युटर’ची दुरुस्ती केली जात आहे.

कोरोना विषाणूचा पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. पुण्यात कोरोनाची लागण झालेले आठ रुग्ण आहेत. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या 11 असून जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 19 वर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यामध्ये अनेक आयटी कंपन्या आहेत. हिंजवडी, खराडी आयटी पट्टयात हजारो कर्मचारी काम करतात.

या कंपन्यांमध्ये परदेशातून येणा-या नागरिकांची संख्या देखील जास्त असते. त्यामुळे आयटी कंपन्यांमधील सर्व कर्मचा-यांना घरुन काम करुन देण्याचे सरकारचे निर्देश आहेत. कर्मचा-यांनी घरुन काम करुन देण्याच्या निर्णयाची कडक अंमलबावणी होते की नाही यावर पोलीस नियंत्रण ठेवून आहेत. तसेच इतर कंपन्यांनी देखील 50 टक्के कर्मचा-यांनाच कामावर बोलवावे अशा सूचना दिल्या आहेत.

आयटी कंपन्यांसह विविध कंपन्यांमधील कर्मचारी घरुन काम करत आहेत. त्यामुळे नवीन ‘लॅपटॉप, कॉम्प्युटर’ची मागणी वाढली आहे. कंपन्यांकडून, वैयक्तिक देखील ‘लॅपटॉप’ भाड्याने मागविले जात आहेत. घरातील नादुरुस्त ‘कॉम्प्युटर’ ची दुरुस्ती केली जात आहे. ‘कॉम्प्युटर’ अपडेट करणे,  अँटी व्हायरस टाकला जात आहे. अँटी व्हायरसची मागणी वाढली आहे. त्यामुळे  ‘कॉम्प्युटर’ दुरुस्त करणा-यांना देखील मागणी वाढली आहे.

याबाबत बोलताना ‘कॉम्प्युटर’ हार्डवेअर इंजिनिअर रवी लाड म्हणाले, ‘वर्क फ्रॉम होम’मुळे ‘लॅपटॉप, ‘कॉम्प्युटर’ भाड्याने मागितले जात आहेत. रिपेअरिंग केले जात आहे. ‘लॅपटॉप’ मध्ये अँटीव्हायरस टाकतात. जुने ‘कॉम्प्युटर’ दुरुस्त केले जातात. अपडेट, रिलोड केले जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून मोठ्या प्रमाणात ‘कॉम्प्युटर’ दुरुस्तीसाठी बोलाविले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.