Pimpri : सुरेश चोंधे यांच्या स्मरणार्थ नगरसेविका आरती चोंधे यांच्याकडून ‘मातृसेवा’ संस्थेला लॅपटॉप भेट

एमपीसी न्यूज – कै.सुरेश चोंधे यांच्या स्मरणार्थ नगरसेविका आरती चोंधे यांनी मातृसेवा सेवाभावी संस्थेला लॅपटॉप भेट दिला. हा लॅपटॉप संस्थापक सुहासराव गोडसे यांच्या हाती सुपुर्द करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच संस्थेमधील सर्व रुग्णांसोबत त्यांनी संवाद साधला.

सुहासराव गोडसे यांच्या पत्नी मानसी गोडसे ह्या सुहास गोडसे यांना या कार्यात पूर्णपणे मदत करत आहेत. हे कुटुंब मिळून ही सेवा गेली 10 वर्षे झाली करत आहेत. आरती चोंधे आणि गोडसे कुटुंबीय हे गेली 8 वर्षापासून संपर्कात आहेत. आरती तुमचे मनापासून आभार, अशा शब्दांत त्यांचे आभार मानले.

त्याचसोबत नगरसेविका सुनीता तापकीर, नगरसेविका नीता पाडाळे, नगरसेविका निर्मला कुटे यांनी देखील खाऊ वाटप केले. त्यांचेही त्यांनी आभार मानले.

संस्कृती खूप लहान वयात इतर मुलींपेक्षा वेगळ कार्य करते आहेस. तुझा सत्कार करुन कौतुक करायचे आहे. या लहानग्या वयात संस्कृती गोडसे या इतर मुलींपेक्षा खूप छान आणि वेगळ कार्य करत आहेत. संस्कृती यांचा महापालिकेतर्फे सत्कार करु, असे आश्वासन या नगरसेवकांनी गोडसे यांना दिले.

यावर संस्कृती गोडसे म्हणाल्या, नगरसेविका आरती चोंधे या सातत्याने आमच्या कार्याला प्रोत्साहन देत असतात. तर,घरातील मुल-सुना पैसे असूनही अशी सेवा करणार नाहीत. ही सेवा गोडसे कुटुंबीय करत असल्याचे नगरसेविका सुनीता तापकीर यांनी म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.