Pimpri : शहीद फायरमन विशाल जाधव यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – दापोडी येथील दुर्घटनेत शहीद झालेले फायरमन विशाल जाधव यांना पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभाग यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अग्निशमन विभाग संत तुकाराम नगर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेविका सुजाता पालांडे, माई काटे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आदी उपस्थित होते.

दापोडी येथे ड्रेनेजच्या खड्ड्यात पडलेल्या तिघांना वाचविण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाचे फायरमन विशाल जाधव मातीच्या ढिगा-यात अडकून शहिद झाले. ही घटना रविवारी (दि. 1) सायंकाळी घडली. अडीच तासानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे. घटना घडल्यानंतर विशाल यांच्या भावाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, विशाल यांच्या जाण्याची माहिती मिळताच त्यांनी मोठा टाहो फोडला. अग्निशमन विभागाच्या जवानांसह उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. ‘अग्निशामक’च्या जवानांचा मृत्यू हि पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाच्या आजपर्यंतच्या कालावधीमधील पहिली घटना आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like