Pimpri : कै. ज्ञानेश्वर देवकुळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रविवारी मोफत आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – कै. ज्ञानेश्वर धुंदाप्पा देवकुळे यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त स्व. ज्ञानेश्वर देवकुळे फाउंडेशनतर्फे नेत्र, दंत, प्लॅस्टिक सर्जरी तपासणी, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तज्ञ वैद्यांकडून सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत. रक्तदान शिबिरातील प्रथम 50 रक्तदात्यांना हेल्मेट भेट देण्यात येणार आहे.

रविवार (दि. 3 फेब्रुवारी) रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या कालावधीत निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे या सर्व तपासण्या होणार आहेत. नेत्र तपासणी डॉ. सचिन धस, दंत तपासणी डॉ. विशाल भोर, प्लास्टिक सर्जरी तपासणी डॉ. दीपक पाटील करणार आहेत. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच सुरक्षित प्रवासासाठी फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिरातील प्रथम 50 रक्तदात्यांना मोफत हेल्मेट देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे.

ज्ञानेश्वर धुंदाप्पा देवकुळे यांनी सँडविक एशिया कंपनीमध्ये कामगार नेता, कामगार शिक्षक म्हणून 28 वर्ष नोकरी केली. त्यांनतर त्यांनी निगडी प्राधिकरण येथील नागरी समस्या सोडविण्यासाठी राजकीय क्षेत्रात पदार्पण करून विविध प्रश्नांना वाचा फोडली. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे उपाध्यक्ष, सद्गुरू जंगली महाराज बँकेचे संचालक आणि उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी सामाजिक समरसता मंचाचे ग्रामीण पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून नेतृत्व केले. तसेच अण्णासाहेब साठे विकास मंडळ निगडी पुणेचे सचिव म्हणून काम पाहिले.

शासनाने त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. महाराष्ट्र सार्वजनिक व्याख्यानमाला समिती सदस्य आणि छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पहिले होते. आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी (8888946045) करण्याचे आवाहन, आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.