Pimpri Corona News : होम आयसोलेट रुग्णांसाठी ‘स्वास्थ हेल्पलाईन’ सुरू; 24 तास मिळणार समुपदेशन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेने कोरोना रुग्ण, होम आयसोलेट रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. होम आयसोलेट असलेल्या रुग्णांसाठी ‘स्वास्थ हेल्पलाईन’ तर कोरोना विषयी माहिती मिळण्यासाठी ‘टेलिमेडिसीन हेल्पलाईन’ सुरू करण्यात आली आहे.

पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत माहिती दिली. आयुक्त म्हणाले, कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. पालिकेने नागरिकांना माहिती देण्यासाठी तीन हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. पालिकेने सुरू केलेल्या हेल्पलाईनवर 24 तास माहिती मिळेल.

कोरोना विषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती देणे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी घ्यावयाची खबरदारी, काळजी तसेच आरोग्यविषयक माहितीसाठी टेलिमेडिसीन हेल्पलाईन आहे.

तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या समुपदेशनासाठी ‘स्वास्थ हेल्पलाईन’ आहे. यासाठी 10 डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले आहे. रुग्णांना येणाऱ्या अडचणींबाबत ते मार्गदर्शन करतील.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने काही रुग्णांना रुग्णालयात बेड मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे ‘हॉस्पिटल बेड मॅनेजमेंट’ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.

टेलिमेडिसीन हेल्पलाईन
020-67331141
020-67331142

स्वास्थ हेल्पलाईन
020-67331143

हॉस्पिटल बेड मॅनेजमेंट हेल्पलाईन
020-67331151
020-67331152

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.