Pimpri: डेक्कन होंडामध्ये नवीन होंडा सिटीचे अनावरण

पेट्रोल मॉडेलची किंमत 10.89 लाखांपासून आणि डिझेल मॉडेलची किंमत 12.39 लाखांपासून पुढे आहे.

0

एमपीसी न्यूज- पिंपरी येथील डेक्कन होंडा शोरुममध्ये होंडा सिटीच्या पाचव्या जनरेशनचे मंगळवारी (दि.28) अनावरण करण्यात आले. उद्योजक सुहास कदम, शशांक आठल्ये आणि युवराज भिरुड यांच्या हस्ते अनावरण सोहळा पार पडला. यावेळी डेक्कन होंडाचे सर्व्हिस जनरल मॅनेजर रिजवान बामणे, ब्रँच हेड प्रशांत पोरे आणि सेल्स मॅनेजर ज्ञानेश्वर काशीद उपस्थित होते.

नवीन होंडा सिटी ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. पेट्रोल मॉडेल हे 1498 सीसी असून iVTEC टेक्नॉलॉजीचा वापर केला असल्याने हे मॉडेल 121 ps इतकी पॉवर आणि 145 nm इतका टॉर्क उत्पादित करते. पेट्रोल मॉडेल मॅन्युअल तसेच CVT (ऑटोमॅटिक) प्रकारात उपलब्ध असून यांचे मायलेज अनुक्रमे 17.8 kmpl आणि 18.4 kmpl इतके चांगले आहे.

डिझेल मॉडेलची 1498 सीसी असून iDTEC टेक्नॉलॉजीचा वापर केला असल्याने हे मॉडेल 100 ps इतकी पॉवर आणि 200 nm इतका टॉर्क उत्पादित करते. पेट्रोल मॉडेल मॅन्युअल प्रकारात उपलब्ध असून यांचे मायलेज 24.1 kmpl आहे.

या नवीन जनरेशनच्या होंडा सिटीमध्ये होंडा कनेक्ट अलेक्सा रिमोट कॅपबिलिटी, लेन वॉच कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग, जी मीटर, फुल एलईडी हेड लॅम्प आणि अशा अनेक आकर्षक सुविधा उपलब्ध आहेत.

पेट्रोल मॉडेलची किंमत 10.89 लाखांपासून आणि डिझेल मॉडेलची किंमत 12.39 लाखांपासून पुढे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like