BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : भीमसृष्टीचे आंबेडकर जयंतीला लोकार्पण

म्युरल्स बसविण्याचे काम युद्ध पातळीवर, सभागृह नेते एकनाथ पवार यांची माहिती

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यानात साकारल्या जाणा-या भीमसृष्टीतील 19 पैकी दोन म्युरल्स बसविण्यात आले आहेत. 20 फेब्रुवारीपर्यंत सर्व म्युरल्स बसविण्यात येणार असून येत्या 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला या भीमसृष्टीचे अनावरण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली.

भीमसृष्टीच्या कामाबाबत अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील यांच्या दालनात आज (बुधवारी) बैठक पार पडली. सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते. या बैठकीत भीमसृष्टीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये स्थापत्यविषयक कामे आणि म्युरल्सच्या कामाची माहिती घेण्यात आली.

यावेळी एकनाथ पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या भीमसृष्टीतील दोन म्युरल्स बसविण्यात आली आहेत. आणखी तीन म्युरल्स उद्या (गुरूवारी) बसविली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण आठ म्युरल्स बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 20 फेब्रुवारीपर्यत सर्वच 19 म्युरल्स बसविण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार हे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. याशिवाय स्थापत्यविषयक कामाच्या निविदा प्राधान्याने मार्गी लावल्या जाणार आहेत.

म्युरल्स पुण्यातील धायरीतील कला संस्कार स्टुडिओमध्ये तयार केले जात आहेत. 16 फूट बाय 12 फूट आकाराचे 4 मोठे प्रमुख म्युरल्स आहेत. एका म्युरल्सचे धातूतील वजन सुमारे 3 हजार किलो आहे. तर, 7 फूट बाय 15 फूट आकाराचे 15 म्युरल्स आहेत. या आकारातील एका म्युरल्सचे वजन सुमारे बाराशे ते पंधराशे किलो आहे.

….अशी आहे भीमसृष्टी!
भीमसृष्टीमध्ये 19 म्युरल्स बसविण्यात येणार आहेत. यामध्ये माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना 26 नोव्हेंबर 1946 रोजी राज्यघटना सुपूर्द करताना, नागपूर येथील दीक्षाभूमी येथे केलेले भाषण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कुटुंबियांसमवेत असलेला फोटो, प्रबुद्ध भारत, मुकनायाक याचे लायब्ररीत टेबलावर लिखाण करताना, माणगाव परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांचा नेता घोषित करताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज अशा वेगवेगळ्या घटनांचे म्युरल्स येथे असणार आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.