Pimpri : भाजपची पहिली यादी जाहीर, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांना उमेदवारी

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरी मतदारसंघातून सहयोगी आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी आज (मंगळवारी) जाहीर झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

लक्ष्मण जगताप यांच्याकडे भाजपच्या पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदाची धुरा आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. 2009 मध्ये ते अपक्ष निवडून आले होते. तर, 2014 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपकडून निवडून येत शहरातील भाजपचे पहिले आमदार झाले होते. आता पुन्हा त्यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाले आहे. जगताप हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

2014 च्या लाटेत अपक्ष म्हणून निवडून आलेले भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. 2014 मध्ये लांडगे यांनी अपक्ष लढत देत 15 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळविला होता. त्यानंतर त्यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यांना आता भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी पिंपरी महापालिकेवर कमळ फुलविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.