BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनसाठी भेट द्यायलाच हवे असे मासुळकर कॉलनीतील “लजीज पिझ्झा”

एमपीसी न्यूज- फेब्रुवारी महिना म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतो तो व्हॅलेन्टाइन डे. आणि त्यावेळी पार्टीसाठी कुठल्यातरी हटके ठिकाणाची शोधाशोध सुरु होते. मग तुम्ही अशा वेगळ्या ठिकाणाच्या शोधात असाल तर यम्मी आणि टेस्टी पिझ्झा सर्व्ह करणा-या ‘लजीज पिझ्झा’ला तुम्ही भेट द्यायलाच हवी. मासुळकर कॉलनीतील अजमेरा रोडवरील प्रेम पार्कमध्ये नुकत्याच सुरु झालेल्या लजीज पिझ्झामध्ये एक सो एक लज्जतदार पिझ्झा तुम्ही ट्राय करायलाच हवेत.

दीक्षा घुगे आणि पंकज कोटक यांनी सुरु केलेले लजीज पिझ्झा हे मूळच्या कोल्हापूरच्या लजीज पिझ्झाची पिंपरी चिंचवडमधील फ्रेंचायजी आहे. तरुणाईची आवड ओळखून त्यांना आवडेल असे पिझ्झा, सॅंडवीत, बर्गर याशिवाय चिकन मधील वेगवेगळे पदार्थ येथे उपलब्ध आहेत. व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही प्रकारातील अक्षरश पंचवीस एक पिझ्झा येथे तुम्हाला ट्राय करता येतील. पिझ्झामधील एवढी व्हरायटी येथे एकाच ठिकाणी उपलब्ध आहे.

या पिझ्झा जॉइंटमधील युवावर्गाला आवडेल असा लाल आणि पांढरा अॅम्बियन्स आपल्याला प्रथमदर्शनीच प्रेमात पाडतो. भरपूर जागा, प्रशस्त टेबल्स आणि ऑर्डर दिल्यानंतर लगेचच टेबलवर येणारा टेस्टी आणि चमचमीच पिझ्झा ही इथली स्पेशालिटी. लजीज देसी या खास शेफ्स रेकमेंडेशन पिझ्झाचा मसाला तर अप्रतिमच आहे. त्याशिवाय चिकन बार्बेक्यू मस्ट ट्राय. थाई चिकन हा आणखी एक वेगळाच पिझ्झा. तसेच लजीज क्लासिक, कार्निवल, व्हेज मॅक्सिकन, चिली पनीर, शेफ्स स्पेशल, व्हेज डिलक्स, चिजी बर्स्ट, पेपर पंच, स्पायसी फ्युजन, मशरुम पॅप्रिका, शेजवान, पनीर टिक्का यासारखे एकापेक्षा एक सरस चवीचे पिझ्झा येथे शाकाहारी प्रकारात उपलब्ध आहेत. याशिवाय मांसाहारीमध्ये देखील भरपूर व्हरायटी आहे. मेक्सिकन चिकन, हॉट चिकन, पेपर चिकन, गार्लिक चिकन, चिकन पॅप्रिका, चीज बर्स्ट, स्पायसी मॅजिक, टिक्का चिकन, चिली चिकन, चिकन सलामी, चिकन सिख कबाब, शेजवान चिकन, बटर चिकन यासारखे अफलातून नॉनव्हेज पिझ्झा देखील आहेत.

पिझ्झापैक्षा वेगळे काही ट्राय करायचे असेल तर बर्गर, फ्रेंच फ्राइज, चिकन नगेटस्, चिकन बोनलेस फिंगर्स, क्रिस्पी फ्राइड चिकन, वेगवेगळ्या प्रकारची सॅंडवीचदेखील येथे आहेत. तसेच मिल्क शेक्स, हॉट टी, कॉफी आणि कोल्ड कॉफी, रेड आणि व्हाइट पास्ता सुद्धा तुम्ही ट्राय करायलाच हवा. डेझर्टमध्ये खास चॉको लावा आणि रेड व्हेलवेट लावा केक खरोखरच खाऊन पाहायलाच हवेत. भरगच्च चॉकलेट भरलेले लावा केक बघताच क्षणी खायच्या मोहात पाडणारेच आहेत.

याशिवाय येथे कॉम्बो ऑफरदेखील आहेत. मिनी, फॅमिली, फ्रेन्ड, सिंगल अशा वेगवेगळ्या ऑफरचा तुम्ही विचार करु शकता. पिझ्झाचे देखील स्मॉल, मिडीयम,लार्ज आणि एक्स्ट्रा लार्ज असे प्रकार आहेत. तसेच मंगळवार, बुधवार व गुरुवारी स्पेशल ऑफर्स आहेत. पिझ्झाचा बेस दररोजच्या दररोज फ्रेश तयार केला जातो. टॉपिंग, सॉसदेखील फ्रेश तयार केले जाते.

सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु असणा-या या लजीज पिझ्झामध्ये बर्थडे पार्टी, ऑफिस पार्टी, किटी किंवा भिशी पार्टी, छोटे फॅमिली फंक्शन, प्रेस कॉन्फरन्ससाठी अगदी योग्य असा हॉल आहे. मग व्हॅलेन्टाईन डे ला कुठे जायचे याचा विचार करत असाल तर आजच ऑर्डर बुक करा आणि धमाल सेलिब्रेशन करा.

पत्ता – लजीज पिझ्झा,
प्रेम पार्क, रिलायन्स टॉवर, मासुळकर कॉलनी, महाराष्ट्र बॅंकजवळ, अजमेरा रोड, पिंपरी, 411018
फोन नंबर – 866 9999 456

.