Pimpri: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ‘वायसीएमएच’ला भेट; कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

Pimpri: Leader of Opposition Devendra Fadnavis visits YCMH; took review of the Corona situation in the city त्यांनी शहरातील कोरोनाची परिस्थिती, महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची संपूर्ण माहिती घेतली.

एमपीसी न्यूज- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.23) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. दरम्यान, नेते, पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याने सुरक्षित अंतर, फिजिकल डिस्टनचा मात्र यावेळी फज्जा उडाल्याचे दिसून आले.

महापौर उषा ढोरे, भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप , माजी खासदार अमर साबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक बाबू नायर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांचे पावणे एकच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात आगमन झाले. त्यांनी शहरातील कोरोनाची परिस्थिती, महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची संपूर्ण माहिती घेतली.

वायसीएम रुग्णालय हे कोविडसाठी समर्पित केले आहे. दरम्यान, फडणवीस यांचे आगमन होताच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने सुरक्षित अंतर, फिजिकल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाला.

दरम्यान, शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात दिवसाला 100 हून अधिक रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना आटोक्यात आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.