Pimpri : तणावमुक्त राहण्यासाठी सतत वर्तमानात जगायला शिका – शंतनू जोशी

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘तणाव व्यवस्थापन’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. व्यवस्थापन तज्ज्ञ व मनुष्य स्वभाव विशेषज्ञ शंतनू जोशी यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशाकडे वाटचाल करताना मनात योग्य विचार आणणे तसेच विचारांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावले.

प्रथम वर्ष फिजिओथेरपी ते चतुर्थ वर्ष फिजिओथेरपी वर्गातील विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाला उपस्थित होते. अपयश म्हणजे इच्छित ध्येयापर्यंत पोहोचताना होणाऱ्या चुकांची दुरुस्ती न करणे होय हे त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले. अपयश हे यश मिळवण्यासाठी किंवा चूक सुधारण्यासाठी मिळालेली संधी आहे, म्हणून अपयशाकडे लक्ष केंद्रित न करता सगळी शक्ती चुकांमधून शिकत राहण्याकडे एकत्रित करणे कसे गरजेचे असल्याचे जोशी यांनी प्रात्यक्षिकातून पटवून दिले.

यशाकडे वाटचाल करताना योग्य विचार मनात आणणे कसे गरजेचे आहे हे विद्यार्थ्यांना समजावले व विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एस्टिमेशन तंत्र विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. भूतकाळातील घटना आणि भविष्यकाळातील चिंता हि तणावाची मुख्य कारणे आहेत तसेच तणावमुक्त राहण्यासाठी सतत वर्तमानात राहणे गरजेचे आहे. ताणमुक्तीसाठी जोशी यांनी विद्यार्थ्यांना ध्यानप्रकार शिकवला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. तुषार पालेकर होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता ध्यानधारनेने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राध्यापक डॉ. स्वप्निल सोनजे यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.