Pimpri :अनावश्यक बाहेर पडल्यास कायदेशीर कारवाई; पोलिसांची सर्व सोसायट्यांना नोटीस

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत कलम 144 नुसार संचारबंधीचा आदेश लागु करण्यात आला आहे. सर्व सोसायटी धारकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी काही सूचना केल्या आहेत. यामध्ये अनावश्यक बाहेर फिरण्यासाठी मज्जाव करण्यात आला असून तशी नोटीस देण्यात आली आहे.तसेच जर कोणी बाहेर आढळल्यास सदर नोटीस हे भविष्यकाळात आवश्यकता भासल्यास पुरावा म्हणुन न्यायालयात सादर करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सोसायटी धारकांना दिलेल्या नोटिसमध्ये खालील गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

 

1) सोसायटी धारकांनी कोणत्याही अनावश्यक कारणास्त्व बाहेर जाऊ नये.

2) अती महत्वाचे कारण असेल तर पोलीस परवानगीने सोसायटीतील कोणताही सदस्य दुचाकी किंवा फोरव्हीलर घेऊन सोसायटीच्या बाहेर जाईल.

3) सोसायटी अध्यक्षांनी किराणा माल, दूध वितरण, भाजीपाला विक्रेते यांच्याशी समन्वय साधून त्यांचे मोबाईल नंबर घेऊन प्रत्येकाला वेगवेगळी वेळ देऊन सोसायटीमध्ये राहणा-या लोकांना सोय करून द्यावी.

4)सोसायटीतून बाहेर जाणा-या व येणा-या लोकांची वेळ व कारण यांची नोंद रजिस्टरमध्ये न चुकता करावी.

5) सोसायटीधारकांना भाजीपाला, किराणा माल अशा किरकोळ कारणास्तव कोणत्याही खासगी वाहनांचा वापर करू नये.

6)सर्व सोसायटीधारकांनी मॉर्निंग वाॅक, इव्हीनींग वाॅक करण्यासाठी तसेच पाळीव प्राणी घेऊन घराबाहेर पडू नये.

या नोटीसीचा कोणत्याही व्यक्तीने भंग केल्यास कलम 188 नूसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.